चंद्रपूर :- २८ ऑक्टोबर २०२६ शहरातील शांतराम पोतदुखे विधी महाविद्यालयाने २५ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित केलेल्या ‘मन की बात’ कार्यक्रमासंदर्भात विद्यार्थ्यांवर दंड व सक्तीची टांगती तलवार लटकवणारी वादग्रस्त नोटीस अखेर मागे घेण्यात आली आहे. एनएसयुआय (NSUI) च्या आक्रमक भूमिकेमुळे महाविद्यालय प्रशासनाला अखेर नरमाईची भूमिका घेत स्पष्टीकरण द्यावे लागले असून, कोणत्याही विद्यार्थ्यावर कारवाई होणार नसल्याची मोठी घोषणा प्रशासनाने केली आहे.
💥 काय होता वाद 💥
महाविद्यालयाने संबंधित कार्यक्रमासाठी डिजिटल संदेशाद्वारे विद्यार्थ्यांना सक्तीची उपस्थिती आणि अनुपस्थितीत दंडात्मक कारवाईचा इशारा दिला होता. या मनमानी कारभारामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीती व रोषाचे वातावरण निर्माण झाले होते.
💥 एनएसयुआयची आक्रमक धाव 💥
विद्यार्थ्यांवर होणारा हा अन्याय हेरून महाराष्ट्र प्रदेश एनएसयुआयच्या शिष्टमंडळाने तात्काळ महाविद्यालय प्रशासनाचे उंबरठे झडपले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितावर गदा आणणारा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड दम देत एनएसयुआयने प्रशासनाला निवेदन दिले आणि सक्तीचा निर्णय तातडीने मागे घेण्याची जोरदार मागणी केली.
💥 प्रशासनाची घुमजाव 💥
एनएसयुआयच्या दणक्यानंतर खडबडून जागी झालेली प्रशासकीय यंत्रणा अखेर वटणावर आली. २७ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रशासनाने अधिकृत स्पष्टीकरण पत्र जारी केले.
- चुकीची कबुली :- प्राथमिक संदेशात अनमनाने किंवा चुकीने ‘सक्ती’ आणि ‘दंडाचा’ उल्लेख झाल्याची कबुली प्रशासनाने दिली.
- दंडात्मक कारवाई नाही :- कोणत्याही विद्यार्थ्याकडून एक रुपयाचाही दंड वसूल करण्यात आलेला नाही आणि भविष्यातही केला जाणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले.
- शिस्तभंगाची कारवाई रद्द :- कार्यक्रमास अनुपस्थित राहिल्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याविरुद्ध कोणतीही शिस्तभंगाची किंवा अनुशासनात्मक कारवाई केली जाणार नाही, असे ठोस आश्वासन महाविद्यालयाने दिले आहे.
“विद्यार्थ्यांच्या अधिकारांवर, सन्मानावर आणि शैक्षणिक हितावर घाला घालणाऱ्या कोणत्याही हुकूमशाही निर्णयाविरोधात एनएसयुआय नेहमीच रस्त्यावर उतरून आक्रमक लढा देईल. विद्यार्थ्यांवर दबाव टाकणाऱ्या अशा प्रवृत्तींना धडा शिकवण्यासाठी आमचा संघर्ष सातत्याने सुरूच राहील.” मनीष दास, सचिव, महाराष्ट्र प्रदेश एनएसयुआय
हे निवेदन देताना एनएसयुआयचे आशीष बोनडे, रमीज शेख, यश दत्तात्रेय, प्रशांत हलदर, माधव मंडल आणि शुभम लवणगेवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. एनएसयुआयच्या या आक्रमक भूमिकेमुळे संतप्त विद्यार्थ्यांमधून प्रशासनाच्या या माघारीचे स्वागत होत असून एनएसयुआयच्या विजयाचे कौतुक होत आहे.





