6 November 2026News Website

नागपुरात महायुतीचा एल्गार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात ‘लोकशाही बचाव’ पदयात्रेत जनसागर

नागपूर :- लोकशाही मूल्यांचे रक्षण, संविधानिक व्यवस्थेचा सन्मान आणि अराजकतेविरोधात जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी नागपूर येथे ‘लोकशाही बचाव, अराजकता हटाव’ या भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या खंबीर नेतृत्वात आणि केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या पदयात्रेत नागपूरच्या भूमीवर अभूतपूर्व जनसागर उसळल्याचे पाहायला मिळाले.



या भव्य पदयात्रेत आमदार प्रा. श्री. राजूभाऊ तोडसाम यांनी अत्यंत उत्साहाने सहभाग नोंदवत कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित केला. महायुतीच्या या संघटित जनशक्तीने आणि कार्यकर्त्यांच्या एकजुटीने नागपूर शहरात एक नवा राजकीय व सामाजिक संदेश दिला.

प्रमुख नेत्यांची उपस्थिती या पदयात्रेत राज्याचे महसूल मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे, भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. हेमंत जोशी, आदिवासी विकास मंत्री श्री. अशोक उईके, राज्यमंत्री श्री. पंकज भोयर, राज्यमंत्री श्री. आशिष जयस्वाल तसेच भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री. संजय कुटे यांसह महायुतीचे सर्व प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



एकजूट जनशक्तीची, निर्धार लोकशाहीच्या रक्षणाचा! हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांमुळे आणि नागरिकांच्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे नागपूरच्या रस्त्यांवर जनसमुदाय ओसंडून वाहत होता. लोकशाही व्यवस्थेचे सक्षमीकरण आणि अराजकतेविरुद्धचा लढा अधिक तीव्र करण्याचा ठाम निर्धार या पदयात्रेच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला. संघटित जनशक्ती आणि कार्यकर्त्यांच्या एकजुटीने ही पदयात्रा ऐतिहासिक ठरली.

अभिषेक किशोर भागडे