वरोरा येथे महायुतीचे उमेदवार सुधाकरजी कोहळे यांच्या प्रचारार्थ महत्त्वपूर्ण बैठक संपन्न!
वरोरा :- नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. श्री. सुधाकरजी विठ्ठलराव कोहळे यांच्या प्रचारार्थ वरोरा येथील भारतीय जनता पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत महायुतीच्या विजयासाठी जोरदार रणधुमाळी उडवून देण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
या बैठकीला चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. अशोकजी उईके साहेब आणि देशाचे माजी केंद्रीय मंत्री मा. श्री. हंसराजजी भैय्या अहिर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश संचारला असून प्रचाराला आता आणखी वेग मिळणार आहे.
यावेळी स्थानिक मंडळ अध्यक्ष, आदरणीय नगरसेवक व नगरसेविका, बूथ प्रमुख, महिला मोर्चा व युवा मोर्चाचे पदाधिकारी, भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने पदवीधर मतदार उपस्थित होते. बैठकीमध्ये आगामी निवडणुकीच्या प्रचाराचे सूक्ष्म नियोजन, संघटनात्मक समन्वय आणि महायुतीच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन करण्यात आले.





