7 November 2026News Website

भद्रावतीत श्री संत नगाजी महाराजांची पुण्यतिथी उत्साहात साजरी; नाभिक समाज बांधवांतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन!

भद्रावती :- शहरातील श्री संत नानाजी महाराज देवस्थान, नगाजी नगर, भद्रावती येथे नाभिक समाज बांधवातर्फे श्री संत नगाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. या महोत्सवानिमित्त समाजातर्फे सत्कार सोहळा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा मोठ्या दिमाखात आयोजित करण्यात आला होता.

प्रतिमेला माल्यार्पण व मार्गदर्शनाने सुरुवात

कार्यक्रमाची सुरुवात श्री संत नगाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी संत नगाजी महाराजांच्या विचारांवर प्रकाश टाकत समाज बांधवांना मोलाचे मार्गदर्शन केले. संत महात्म्यांच्या विचारांवर चालत समाजाने एकत्र येऊन शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात प्रगती साधण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

💥 सत्कार सोहळा संपन्न 💥

या विशेष कार्यक्रमात समाज बांधवांतर्फे माजी नगराध्यक्ष वरोरा येथील श्री.अहेतेशाम अली यांचा सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच समाजातील होतकरू आणि गुणवंत विद्यार्थ्यांचाही यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.

🙏 मान्यवरांची लक्षणीय उपस्थिती 🙏

या महोत्सवास नाभिक समाजाचे पदाधिकारी, नागरिक आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • प्रमुख उपस्थिती :- रवींद्र हनुमंते, हरीश घुमे, सचिन नक्षिने, सुरेशराव जमदाडे, पांडुरंग हनुमंते, जितेंद्र नागतुरे, सतीश मांडवकर, सुधीर लांडगे, सागर घुमे आदी मान्यवर उपस्थित होते.
  • महिला कार्यकर्त्यांचा सहभाग :- महिला वर्गही मोठ्या संख्येने सक्रिय असून यात छायाताई जमदाडे, रागिणी सुत्रपावार, मीनाताई जांभूळकर, शालिनीताई शेंडे, भुवनेश्वरी निंबाळकर, स्वीताताई लांडगे यांच्यासह अनेक महिला समाज बांधवांनी कार्यक्रमात उत्साही सहभाग नोंदवला.

“संतांचे विचार आणि शिकवण हीच आपली खरी संपत्ती आहे. अशा धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांमुळे समाजात एकता टिकून राहते आणि युवा पिढीला योग्य दिशा मिळते.” असा सूर यावेळी उपस्थित नागरिकांमधून व्यक्त करण्यात आला.

महाप्रसाद आणि पसंतीचे कार्यक्रम पार पडल्यानंतर या भव्य महोत्सवाची यशस्वी सांगता झाली.

अभिषेक किशोर भागडे