7 November 2026News Website

सर्वपक्षीय कोजागिरी पौर्णिमा स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न; दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीने रंगला सोहळा

वरोरा :- चंद्राच्या शीतल प्रकाशात, आपुलकीच्या आणि मैत्रीच्या नात्यांचा गोडवा अनुभवत वरोरा येथे ‘वरोराकरान तर्फे सर्वपक्षीय स्नेहमंच’च्या वतीने आयोजित ‘कोजागिरी पौर्णिमा स्नेहमंच 2026 अत्यंत दणक्यात आणि दिमाखात पार पडले. सद्भावना चौक, वरोरा येथील शेतकरी भवनात पार पडलेल्या या भव्य सोहळ्याने संपूर्ण वरोरा शहराचे लक्ष वेधून घेतले.



या विशेष कार्यक्रमात चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या लोकप्रिय खासदार प्रतिभाताई धानोरकर आणि वरोरा-भद्रावती निर्वाचन क्षेत्राचे लोकप्रिय आमदार करणदादा देवतळे यांच्या प्रमुख उपस्थितीने कार्यक्रमाची शान द्विगुणित केली. याशिवाय प्रकाशबाबु मुथा, डॉ. रमेश राजुरकर, डॉ. विजय देवतळे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे,भद्रावती नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रफुलभाऊ चटकी, वरोऱ्याचे माजी नगराध्यक्ष ऐतेशाम अली, वरोरा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. अर्चना आशिष ठाकरे, उपाध्यक्ष सौ. योगिता भारत नेरकर, वेदांती देवतळे, शंभुनाथ वरर्गणे, डॉ. जाजू, श्रीकांत पाटील, जयंत टेमुर्डे, अनिल भाऊ धानोरकर यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाबा भागडे,राजेंद्र चिकटे, प्रवीण काकडे, डॉ, सागर वझे, बंडू डाखरे, वरोरा शहरातील पत्रकार बंधू उपस्थित होते.

विशेष आयोजक व कार्यकर्ते :- हा सोहळा यशस्वी करण्यासाठी वरोराकर सर्वपक्षीय स्नेहमंच अंतर्गत खालील आयोजकांनी व कार्यकर्त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.विठ्ठल टाले ,रमेश मेश्राम ,गणेश चवले ,सुभाष दांडगे ,विनोद बाफनाजी ,शरद यादव,विलासभाऊ नेरकर ,विजय मोकाशी ,सिंग साहेब , गोपाळ धोटे , राम जुनघरे  ,शरद यादव ,अतुल वानखेडे ,प्रमोद बोरा,पंकज राजुरकर, प्रमोद वाभीटकर ,वैभव डहाणे यांनी आयोजन केले आहे, आयोजन हे उत्तम पद्धतीचे होते.

‘चंद्राच्या शीतल प्रकाशात, आपुलकीच्या नात्यांचा गोडवा अनुभवण्यासाठी’ आयोजित केलेल्या या स्नेहसंमेलनाला शहरवासीयांनी आणि कुटुंबीयांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. सर्वपक्षीय नेत्यांच्या, संपूर्ण नगरसेवक व दिग्गज मान्यवरांच्या आणि सर्व आयोजकांच्या सक्रीय सहभागामुळे या सोहळ्याला राजकीय व सामाजिक क्षेत्रात एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले होते. स्नेहभोजनाचा आस्वाद घेत उपस्थितांनी एकमेकांशी संवाद साधत कोजागिरी पौर्णिमेच्या मनमोहक रात्रीचा मनसोक्त आनंद घेतला.

“आपली उपस्थिती हीच आमच्यासाठी प्रेरणा आहे, चला आपुलकीच्या या स्नेहमेळाव्यात एकत्र येऊया,” या उदात्त हेतूने पार पडलेल्या या कार्यक्रमाने वरोरा शहरात एकोपा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण केले.

अभिषेक किशोर भागडे