7 November 2026News Website

महाराष्ट्रात वणीचे मनसेचे तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांना मानाचा’लोकमत यवतमाळ जिल्हा गौरव पुरस्कार २०२६’ जाहीर!

जनसामान्यांच्या प्रश्नांवर लढणाऱ्या धडाडीच्या नेतृत्वाची महनीय दखल वणी तालुक्यात मनसे सैनिकांचा जोरदार जल्लोष!

वणी :- आपल्या करारी बाणा, रोखठोक भूमिकेसाठी आणि जनतेच्या प्रत्येक समस्येवर प्रशासनाला सळो की पळो करून सोडणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वणी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांना यंदाचा अत्यंत मानाचा ‘लोकमत यवतमाळ जिल्हा गौरव पुरस्कार २०२६’ जाहीर झाला आहे. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांनी गाजवलेल्या उल्लेखनीय कर्तृत्वाची आणि निडर जनसेवेची दखल घेत ‘लोकमत’ समूहाने त्यांचा हा गौरव केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे व राजूभाऊ उंबरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सदैव समाजसेवेचा आदर्श ठेवून त्यांच्या विचारधारेवर चालणारे.



वणी तालुक्यात शेतकरी, कामगार, सर्वसामान्य नागरिक आणि बेरोजगार तरुणांच्या न्याय्य हक्कांसाठी फाल्गुन गोहकार यांनी नेहमीच मनसे स्टाईलने आक्रमक लढे उभारले आहेत. भ्रष्ट यंत्रणा आणि अन्यायाविरोधात कधीही तडजोड न करता रस्त्यावर उतरून न्याय मिळवून देण्याच्या त्यांच्या कार्यशैलीमुळे त्यांनी संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात एक वेगळी आणि दरारा निर्माण करणारी ओळख प्रस्थापित केली आहे.

मनसे वणी तालुका अध्यक्षपदाची धुरा सांभाळताना त्यांनी तळागाळापर्यंत पक्षाचा संघटन विस्तार केला असून, प्रत्येक सामान्य माणसाच्या सुख-दुःखात ते नेहमी धावून जातात. त्यांच्या याच निस्वार्थ आणि धडाडीच्या लोकसेवेचा गौरव म्हणून त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.

“हा पुरस्कार माझा नसून वणी तालुक्यातील माझ्या तमाम जनता-जनार्दन आणि प्रत्येक निष्ठावान मनसे सैनिकाचा आहे. जनतेच्या हक्कासाठी आणि अन्यायाविरुद्धचा हा संघर्ष यापुढेही अधिक तीव्रतेने आणि जोमाने सुरूच राहील!”  फाल्गुन गोहोकार, तालुका अध्यक्ष, मनसे (वणी).

कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण व अभिनंदनाचा वर्षाव :- फाल्गुन गोहोकार यांना ‘लोकमत जिल्हा गौरव पुरस्कार २०२६’ जाहीर झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच वणी शहरासह संपूर्ण तालुक्यात मनसे कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून जोरदार जल्लोष केला. राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

अभिषेक किशोर भागडे