7 November 2026News Website

भाजपची मास्टरस्ट्रोक रणनिती! महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकांसाठी शिलेदार जाहीर; विजय निश्चित करण्यासाठी कमळ सज्ज!

 मुंबई :- महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुका २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने अत्यंत महत्त्वाची आणि धोरणात्मक घोषणा केली आहे. राज्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या स्नातक (पदवीधर) आणि शिक्षक मतदारसंघांसाठी भाजपने आपल्या तगड्या व विजयाची खात्री असलेल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पक्षाच्या या आक्रमक निर्णयामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली असून विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.



भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत पत्रकानुसार, खालील उमेदवारांच्या नावांवर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

  • पुणे विभाग स्नातक मतदारसंघ :- डॉ. (श्रींती) स्मिता योगेश जाधव यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
  • नागपूर विभाग स्नातक मतदारसंघ :- श्री. सुधाकर विठ्ठलराव कोहळे यांच्यावर पक्षाने मोठी मदार सोपवली आहे.
  • पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ :- श्री. कौस्तुभ मुरलीधर गावडे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

पक्षाचे राष्ट्रीय मुख्यालय प्रभारी व खासदार तरुण चुघ यांच्या स्वाक्षरीने ही अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. या तडाखेबंद उमेदवारांच्या घोषणेमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत असून, आगामी निवडणुकीत विरोधकांना धुूळ चारण्यासाठी कमळाचे शिलेदार पूर्ण ताकदीने मैदानात उतरण्यास सज्ज झाले आहेत.

अभिषेक किशोर भागडे