7 November 2026News Website

शाळकरी मुलांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर FDA चा मोठा दणका!

मुंबई :- राज्यातील शाळा आणि अंगणवाड्यांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देत FDA (अन्न व औषध प्रशासन) ने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि कठोर निर्णय घेतला आहे. यापुढे परवान्याशिवाय शाळा, अंगणवाड्या किंवा वस्तीगृहांमध्ये अन्न पुरवठा करण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून, या नियमाची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.



     💥 ठळक मुद्दे 💥

  • परवाना आणि नोंदणी बंधनकारक  :- शाळांमधील कॅन्टीन, मध्यान भोजन (Mid-Day Meal) योजना, वस्तीगृहांचे स्वयपाकगृह आणि सर्व अन्न पुरवठादारांकडे FSSAI चा परवाना असणे आणि नोंदणी करणे अनिवार्य आहे.
  • विना-परवाना पुरवठादारांवर कारवाई :- ज्या पुरवठादारांकडे FSSAI चा परवाना नसेल, त्यांना शाळा किंवा अंगणवाड्यांमध्ये अन्न पुरवठा करता येणार नाही.
  • फक्त परवानाधारकच चालणार :- शाळा किंवा अंगणवाड्यांना आता केवळ परवानाधारक कॉन्ट्रॅक्टर किंवा अन्न पुरवठादारांचीच नियुक्ती करावी लागेल.
  • कडक अंमलबजावणीचे आदेश :- विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर या नियमाच्या माध्यमातून कठोरचक कसोट्यांवर कारवाई केली जाणार आहे.

अभिषेक किशोर भागडे