
वरोरा :-सध्या वरोरा शहरात आणि विशेषतः गजबजलेल्या बाजारपेठेत मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर, वरोरा पोलीस स्टेशनच्या वतीने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी एक विशेष जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली असून, “सुरक्षित वरोरा… सुरक्षित परिवार” असा नारा देत पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
👉 तुमचा मोबाईल तुमची जबाबदारी!
गर्दीच्या ठिकाणी मोबाईल सांभाळताना नागरिकांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. पोलिसांच्या आवाहनानुसार, खालील गोष्टींकडे लक्ष देणे अनिवार्य आहे:
👉 गर्दीत सतर्क राहा बाजारपेठ, बस स्थानक किंवा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये मोबाईल चोरट्यांची नजर तुमच्या खिशावर असू शकते.
👉 मोबाईलचा वापर :-गर्दीच्या ठिकाणी मोबाईलवर बोलताना किंवा वापरताना आजूबाजूच्या हालचालींकडे दुर्लक्ष करू नका.
👉 संशयास्पद व्यक्ती :-आपल्या आसपास कोणी संशयास्पद व्यक्ती आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा.
👉 तातडीच्या मदतीसाठी डायल ११२
मोबाईल चोरीला गेल्यास किंवा कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता त्वरित ‘डायल ११२’ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन वरोरा पोलिसांनी केले आहे. पोलिसांच्या या तत्परतेमुळे गुन्हेगारांवर वचक बसेल आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल.
👉 “सतर्क नागरिक, सुरक्षित समाज” या ब्रीदवाक्याला अनुसरून वरोरा पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी फलक लावून नागरिकांना जागरूक करण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घेणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.
“चला, वरोरा पोलिसांच्या या मोहिमेला साथ देऊया आणि आपला शहर सुरक्षित ठेवूया ”
🙏 जय विदर्भ 🙏



