ब्रह्मपुरी :- ब्रह्मपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागरिकांचे हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाईल शोधून काढण्यात ब्रह्मपुरी पोलिसांना मोठे यश आले आहे. ‘CEIR Portal’ च्या माध्यमातून तांत्रिक त The तपास करत पोलिसांनी तब्बल ४१ मोबाईल हस्तगत केले आहेत. विशेष म्हणजे, दिवाळीच्या पूर्वसंध्येला हे सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकांच्या सुपूर्द करण्यात आल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला. मोबाईल परत मिळाल्याने सर्व नागरिकांनी ब्रह्मपुरी पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
उच्चाधिकारी आणि तपास पथकाचे सहकार्य
सदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, ब्रह्मपुरी विभागाचे श्री. साहिल झारकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या धडक मोहीमेत पोलीस निरीक्षक श्री. कांचन पं. पांडे, गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. मनोज खड्से, पोलीस हवालदार मुकेश गजंबे, मिलिंद नैताम तसेच पोलीस अंमलदार प्रविण भिवगडे, निलेश तुमसरे, इशाद खान, स्वप्नील पळसपगार आणि परिष्ट रंगारी यांनी अत्यंत मोलाची व महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ब्रह्मपुरी पोलिसांच्या या कामगिरीमुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.





