वरोरा :- नगर परिषद वरोरातर्फे कमला नेहरू प्रभागातील चिरघर प्लॉट येथील खुल्या पटांगणात नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी नवीन बोरवेलच्या कामाचे उद्घाटन नुकतेच पार पडले. संत गजानन महाराज भक्त परिवार बहुसंस्थेच्या वतीने मागील ८ महिन्यांपासून याबाबत सातत्याने पाठपुरावा केला जात होता. अखेर नगर परिषदेकडून हिरवा कंदील मिळाल्याने या परिसरातील पाण्याची सोय होणार असून, यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
या भूमिपूजन सोहळ्यास वरोरा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सौ. अर्चनाताई आशिष ठाकरे, उपाध्यक्ष सौ. योगिता नेरकर, पाणीपुरवठा सभापती श्री. गजानन जीवतोडे, नगरसेवक श्री. गजाननजी मेश्राम, श्री. बंडूभाऊ देऊळकर, सौ. मंगला पिंपळकर, सौ. सीमाताई तडस, श्री. कुणालभाऊ रुयारकर, तसेच नगर परिषदेचे अभियंता श्री. कांबळी सर उपस्थित होते.
यावेळी संत गजानन महाराज भक्त परिवार बहुसंस्थेचे पदाधिकारी, वॉर्डातील ज्येष्ठ नागरिक आणि मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते.





