9 November 2026News Website

थरार ! मध्यरात्री धावत्या रक्ताचे पाणी करून घेतलेला ‘ऑटो’ आगीच्या भक्ष्यस्थानी; वरोऱ्यातील अभ्यंकर वार्डात खळबळ.

वरोरा :-शहरातील बोबडे लेआउट, अभ्यंकर वार्ड परिसरात काल मध्यरात्री एक भीषण घटना घडली. किशोर वासूदेव राऊत यांच्या मालकीच्या पेट्रोल+सीएनजी थ्री-व्हीलर ऑटोला अचानक भीषण आग लागली. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केल्याने संपूर्ण ऑटो जळून खाक झाला आहे. सुदैवाने, या घटनेत मोठी जीवितहानी टळली असली तरी राऊत यांचे मोठे नुकसान झाले आहे.
👉 नेमकी घटना काय ?
मिळालेल्या माहितीनुसार, किशोर राऊत यांचा MH 34 BH 4171 क्रमांकाचा ऑटो रात्री उभा असताना अचानक पेटला. आगीच्या ज्वाळा इतक्या भयानक होत्या की पाहता पाहता ऑटोचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला. रात्रीच्या शांततेत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.
👉 मोठा अनर्थ टळला !
हा ऑटो सीएनजी किटवर आधारित असल्याने मोठा स्फोट होण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, निसर्गाची कृपा म्हणा किंवा दैवाचा हात, भीषण आगीतही सीएनजी टँक सुरक्षित राहिला. टँकचा स्फोट झाला असता तर आजूबाजूच्या घरांना आणि नागरिकांना मोठा धोका निर्माण झाला असता. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
👉 आग नेमकी लागली कशी ?
भरवस्तीत लागलेल्या या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली की घातपात? या दिशेने आता चर्चांना उधाण आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले असून, आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस तपास वेगाने सुरू आहे.
“माझ्या उदरनिर्वाहाचे साधन डोळ्यादेखत जळून खाक झाले,” अशी भावना मालक किशोर राऊत यांनी व्यक्त केली असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
🙏 जय विदर्भ 🙏

अभिषेक किशोर भागडे