Home Breaking News आमदार निधीतून विकासाची गंगा घराघरात; मोहबाळा व नायदेव परिसरात बोरवेलचे थाटात उद्घाटन.

आमदार निधीतून विकासाची गंगा घराघरात; मोहबाळा व नायदेव परिसरात बोरवेलचे थाटात उद्घाटन.

वरोरा :-मोहबाळा लोकहित आणि जनसेवेचा वरसा जपत, वरोरा – भद्रावती निर्वाचन क्षेत्राचे लोकप्रिय आमदार करणदादा देवतळे यांच्या निधी २०२५-२०२६ अंतर्गत नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी मोहबाळा ग्रामपंचायत क्षेत्रात दोन महत्त्वपूर्ण बोरवेलचे (कूपनलिका) उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. रखरखत्या उन्हात नागरिकांना दिलासा देणारा हा उपक्रम आमदार महोदयांच्या विकासात्मक दृष्टीचा पुरावा ठरला आहे.
👉 १. नागमंदिर परिसराचा पाण्याचा प्रश्न सुटला !
नायदेव येथील नागमंदिर परिसरात अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत होती. ही गरज ओळखून येथे नवीन बोरवेल मंजूर करण्यात आली. याच्या उद्घाटन प्रसंगी गावातील ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
👉 प्रमुख उपस्थिती :- वासुदेव उरकांदे, रविंद्र दातारकर, भीमराव मडावी, तात्या काळे, बरडे व इतर ग्रामस्थ.
👉 २. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात भक्तीसोबतच मिळणार तृप्ती !
मोहबाळा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मोकाशी ले-आउटमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातही दुसऱ्या बोरवेलचे उद्घाटन करण्यात आले. मंदिराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची आणि स्थानिक रहिवाशांची तहान आता या कूपनलिकेमुळे भागणार आहे.
👉 प्रमुख उपस्थिती :-वासुदेव उरकांडे, संदीप डुडूरे, बोधे साहेब, बंडू ढेंगळे यांच्यासह सहारे सर, घुगल सर आणि काळे सर यांची विशेष उपस्थिती होती.
“जनसामान्यांचा विकास, हेच आमचे ध्येय!”
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “आमदार निधीचा विनियोग हा थेट जनतेच्या हितासाठी होत आहे. केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष कामातून विकास कृतीत उतरवला जात आहे.”
🙏 ग्रामस्थांचा आनंद 🙏
बोरवेलचे पाणी लागताच स्थानिक महिला व नागरिकांनी आनंद व्यक्त केला असून, “आता आमच्या पाण्याचा प्रश्न सुटला” अशी भावना व्यक्त करत आमदार महोदयांचे आभार मानले आहेत. या उपक्रमामुळे परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

🙏 जय विदर्भ 🙏