वरोरा :- वरोरा येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्या पक्षाच्या वतीने निखिल मांडवकर (जिल्हाध्यक्ष, युवा सेना) यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पंचायत समितीमध्ये विविध विकासकामांच्या मागण्यांसाठी आक्रमक आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनादरम्यान, “प्रशासनाकडे निधी नसल्यामुळे सदर कामे करण्यात येणार नाहीत,” असे स्पष्टीकरण गटविकास अधिकारी (B.D.O.) यांनी दिले. प्रशासनाच्या या उदासीन भूमिकेचा निषेध करण्यासाठी आणि शासनाचे डोळे उघडण्यासाठी मौजा लोणार (धोटे) येथील गावकऱ्यांनी आणि शिवसैनिकांनी पंचायत समितीसमोर अनोखे ‘भीक मांगो’ (भिक मागण्याचे) आंदोलन छेडले.
प्रमुख मागण्या :
- लोनार (धोटे) त सांडपाणी साफ , नाली साफ, फवारणी करणे
- लोनार (धोटे) त नळाची योजना मंजूर करणे
- लोनार (धोटे) त फिल्टर योजना लवकरात लवकर सुरू करणे
- विहिरींचे पाणी खराब झाल्यामुळे पिण्यासाठी शुद्ध पाण्याची सोय करणे.
- लोनार (धोटे) त रस्ते योजना राबवणे.
- लोनार (धोटे) त मळ योजना सुरळीत करणे.
- 👉 त्यानंतर बीडीओ साहेबांसोबत चर्चा करण्यात आली व चर्चेमध्ये दोन दिवसात जे-जे कामे शक्य होणार तेथे करून देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानंतर हे आंदोलन माझी घेण्यात आले आहे
उपस्थित मान्यवर व कार्यकर्ते:
सदर आंदोलनात सचिन दडमल, कुणाल चौधरी, विशाल तुराळे , समीर तुराळे , सचिन बोरकर, सुरज थाटे, राहुल भाटे, अजय बदकी, सुजल बंदा, अमोल दडमल, सिनाफ टोगे, अनिकेत बरडे, उमेश टोगे, निखिल बरडे, समीर टोगे, रवींद्र तुराळे , रोशन नोरे , नितेश तुरुळे, सुमीत जांभुळे यांच्यासह मौजा लोणार (धोटे)येथील ग्रामस्थ व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




