वरोरा :-रोटरी क्लब वरोरा आणि श्री विठ्ठल मंदिर देवस्थान, वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने श्री मोठे विठ्ठल मंदिर देवस्थान येथे भव्य मोफत नेत्र व दंत तपासणी शिबिर अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडले. सामाजिक बांधिलकी जोपासत आयोजित केलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शिबिरात परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत एकूण १२० रुग्णांनी (पेशंट्सने) आपली नेत्र तपासणी करून घेतली. तसेच, गरजूंना डोळ्यांचे चष्मे उपलब्ध करून देत त्यापैकी ५० लोकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. दंत तपासणी करण्यात आली.
🙏 मान्यवर व तज्ज्ञांची उपस्थिती 🙏
👉 नेत्ररोग तज्ज्ञ :- डॉ. निखिल अ. लांबट
👉 दंत चिकित्सक :- डॉ. स्नेहदीप रामटेके
⭕ प्रकल्प प्रमुख :- रोटे. म.योगेश डोंगरवार
💠 अध्यक्ष :- रोटे. अभिजित मणियार
💠 सचिव :- रोटे. अभिजित बोथले
या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची सविस्तर तपासणी करून त्यांना योग्य ते आरोग्याविषयी मार्गदर्शन केले. रोटरी क्लब वरोराचे अध्यक्ष, पदाधिकारी तसेच श्री विठ्ठल मंदिर देवस्थानचे विश्वस्त व सदस्य यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी झाला. आरोग्यसेवेच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.




