वरोरा :- महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वरोरा येथील शेतकरी भवन येथे एका प्रेरणादायी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जोपासत पार पडलेल्या या शिबिराला परिसरातील नागरिकांचा व तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमाला आमदार करणदादा देवतळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली असून, त्यांनी रक्तदात्यांचा उत्साह वाढवला. विधानसभा संयोजक श्री. राहुल बांदुरकर यांनी या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले होते.
हे रक्तदान शिबिर जीएमसी हॉस्पिटल, चंद्रपूर येथील रक्तपेढीच्या सहकार्याने अत्यंत यशस्वीरीत्या पार पडले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजक संतोषजी पवार , सहसंयोजक अजिंक्यजी नरडे , हर्षद बोडणे तसेच श्री. गजाननजी राऊत, अनिकेत नाकाडे, प्रशांत उलमले जगदीश तोटावार, किशोर बावने,यांनी विशेष परिश्रम घेतले.
या शिबिरात एकूण १५ रक्तदात्यांनी पुढे येत आपले अमूल्य रक्तदान केले. रक्तदात्यांच्या या सामाजिक कार्याचा गौरव करण्यासाठी आयोजकांच्या वतीने प्रत्येक रक्तदात्याला भेटवस्तू म्हणून वॉल वॉच (घड्याळ) प्रदान करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात आलेल्या या समाजोपयोगी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.




