Home Breaking News अहेरीत प्रशासनावर जीवघेणा हल्ला! कर व प्रशासकीय अधिकार्‍याला मारहाण; सरकारी यंत्रणेत खळबळ

अहेरीत प्रशासनावर जीवघेणा हल्ला! कर व प्रशासकीय अधिकार्‍याला मारहाण; सरकारी यंत्रणेत खळबळ

अहेरी :-अहेरी नगरपंचायतीमध्ये कार्यरत असलेले कर व प्रशासकीय अधिकारी श्री. वैभव पांढरे यांच्यावर भर कार्यालयात जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे अहेरीतील शासकीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांमध्ये प्रचंड भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना केवळ एका अधिकार्‍यावर झालेला हल्ला नसून, ती थेट सरकारी यंत्रणेच्या प्रतिष्ठेवर आणि अधिकारावर मारलेला घाला आहे, असा संताप व्यक्त केला जात आहे.
दिनांक १०/०६/२०२६ रोजी सकाळी अहेरी नगरपंचायत कार्यालयात ही संतापजनक घटना घडली. अजय कंकडलवार व त्यांच्या साथीदारांनी कर्तव्यावर असलेल्या वैभव पांढरे यांच्यावर हल्ला केला. सरकारी कर्तव्य बजावत असताना झालेल्या या हल्ल्याने प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
 कर्मचार्‍यांचे मनोधैर्य खच्ची; संघटना आक्रमक
या घटनेचा महाराष्ट्र नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटनेने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. अशा हल्ल्यांमुळे भविष्यात कर्मचारी आपले कर्तव्य कसे बजावणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या घटनेमुळे कर्मचार्‍यांचे मनोधैर्य खच्ची होत असून, प्रशासनाने याची गंभीर दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
           प्रशासनाकडे कडक कारवाईची मागणी
🟡 हल्लेखोर अजय कंकडलवार व त्यांच्या साथीदारांवर भारतीय न्याय संहितेनुसार त्वरित कठोर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना तत्काळ अटक करावी.
🟡 शासकीय कर्मचार्‍यांना कर्तव्य बजावताना संरक्षण मिळावे, यासाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना राबविण्यात याव्यात.
🟡 दोषींवर अशी कठोर कारवाई व्हावी की, भविष्यात अशी घटना घडवण्याची कोणाचीही हिंमत होऊ नये.
आता सरकार या आक्रमक हल्ल्याची दखल घेऊन संबंधितांवर काय कारवाई करते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
वरोरा नगरपरिषदेचे संपूर्ण कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहे व आरोपीवर कारवाई होत पर्यंत काम बंद आंदोलन सूरूच राहणार आहे