Home Breaking News वरोरा नगर परिषदेचा कारभार ‘रामभरोसे’; आर्थिक गैरव्यवहाराच्या संशयावरून शिवसेना (शिंदे गट) आक्रमक

वरोरा नगर परिषदेचा कारभार ‘रामभरोसे’; आर्थिक गैरव्यवहाराच्या संशयावरून शिवसेना (शिंदे गट) आक्रमक

वरोरा :- माननीय मुकेशभाऊ जीवतोडे चंद्रपूर लोकसभा संघटक ( शिंदे गट )यांच्या मार्गदर्शनाखाली आज  प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करणार वरोरा नगर परिषदेतील सुरू असलेला भोंगळ कारभार, नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे केलेले दुर्लक्ष आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या वाढत्या तक्रारींमुळे शिवसेना (शिंदे गट) आक्रमक झाली आहे. या सर्व गंभीर मुद्द्यांवर आज शिवसेना (शिंदे गट) वरोराच्या वतीने मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना सविस्तर निवेदन देऊन प्रशासनाला जाब विचारला आहे.
वादग्रस्त’ कंत्राटदाराला बिल अदा केल्याने खळबळ
नगर परिषदेतील एका वादग्रस्त कंत्राटदाराचे देयक मंजूर करण्यावरून सध्या शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, विधानसभा क्षेत्रात आमदारांनी ज्या कंत्राटदाराला ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये टाकण्याची मागणी केली होती, त्याच कंत्राटदाराला प्रशासनाने नियम धाब्यावर बसवून देयके अदा केल्याने संशय बळावला आहे. या बिल मंजुरीच्या मोबदल्यात विरोधी पक्षातील काही नगरसेवकांनी आर्थिक देवाणघेवाण केल्याच्या चर्चांवरून शिवसेनेने कडाडून टीका केली. “आम्ही दोन नगरसेवक विरोधी पक्षात असून, कोणत्याही प्रकारची तडजोड किंवा रक्कम स्वीकारलेली नाही. जे तडजोड करतात त्यांनी सरळ सत्ताधारी पक्षात जाऊन बसावे,” अशा शब्दांत शिवसेनेने ठणकावले आहे.
निविदा प्रक्रियेत मोठा ‘आर्थिक घोळ’?
नगर परिषदेच्या विविध प्रकल्पांमधील विलंब म्हणजे भ्रष्टाचाराला दिलेले आमंत्रण असल्याची टीका शिवसेनेने केली आहे.
सजावटी विद्युत खांब :-जाजू हॉस्पिटल ते रेल्वे स्टेशन मार्गावर खांब उभारण्याचे काम निविदा होऊनही अद्याप सुरू नाही.
स्वच्छता विभाग :- निविदा पूर्ण होऊनही त्या उघडण्यास होणारा विलंब हा आर्थिक गैरव्यवहाराचा भाग असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
नमो उद्यान :- शासनाची ही महत्त्वाकांक्षी योजना जूनअखेर पूर्ण होणे अपेक्षित असताना, अद्याप वर्क ऑर्डरही दिलेली नाही. निधी परत गेल्यास त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा देण्यात आला आहे.
जनतेच्या प्रश्नांवर अधिकारी ‘बधिर’
नगर परिषदेचे मुख्याधिकारी लोकप्रतिनिधींचे फोन उचलत नाहीत आणि जनतेच्या कामांना दाद देत नाहीत, असा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. आता या सर्व प्रकाराची तक्रार शिवसेना नेते मुकेशभाऊ जीवतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे केली जाणार आहे.
निवेदन देताना उपस्थित मान्यवर
यावेळी शिवसेना नेते राजु महाजन , शिवसेना गट नेते व नगरसेवक  खेमराजजी कुरेकार , नगरसेवक कुणाल रुयारकर , शहर प्रमुख संदीप मेश्राम , माजी नगरसेवक  दिनेश यादव , तसेच  मनीष दोहतरे, अनिकेत काळे, राजा थैम, विकी गंधारे, स्वप्नील येटे, सौरव टाले, करणं माथनकर, प्रफुल गेडेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगर परिषद प्रशासनाने तातडीने सुधारणा न केल्यास वरोरा शहरवासियांना सोबत घेऊन तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.