नागपूर: आज आपल्या चविष्ट आणि तिखट ‘तर्री पोह्यांसाठी’ जगप्रसिद्ध असलेल्या नागपूर शहराने आज एक नवा इतिहास रचण्याच्या दिशेने पाऊल उचलले आहे. आंतरराष्ट्रीय पोहा दिनाचे औचित्य साधून, आज ७ जून रोजी नागपुरात तब्बल ३००० किलो तर्री पोहे बनवून एक नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला जात आहे.
विष्णुजी की रसोई, काचीपुरा येथे हा भव्य उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ६:३० वाजल्यापासून सुरू झालेले हे मोफत वितरण १०:३० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. नागपूरच्या खाद्यसंस्कृतीचा हा सन्मान पाहण्यासाठी आणि या ऐतिहासिक विक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी नागपूरकरांनी मोठी गर्दी केली आहे.
”नागपूरची ओळख असलेल्या तर्री पोह्यांना जागतिक व्यासपीठ मिळावे, हाच आमचा उद्देश आहे,” असे आयोजकांनी सांगितले. हा उपक्रम केवळ एका पदार्थाचा सन्मान नसून नागपूरच्या एकतेचे प्रतीक मानले जाते.




