Home Breaking News रोटरी क्लब वरोराकडून ITI मध्ये ‘सेनेटरी पॅड वेंडिंग मशीन’चे लोकार्पण

रोटरी क्लब वरोराकडून ITI मध्ये ‘सेनेटरी पॅड वेंडिंग मशीन’चे लोकार्पण

वरोरा :-दिनांक02/06/2026 रोजी मंगळवार महिला सक्षमीकरण, स्वच्छता आणि आरोग्य या त्रिसूत्रीवर आधारित सामाजिक बांधिलकी जपत, रोटरी क्लब वरोराच्या वतीने स्थानिक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (ITI) विद्यार्थिनींसाठी ‘सेनेटरी पॅड वेंडिंग मशीन’ बसविण्यात आले आहे. या उपक्रमाचे उद्घाटन नुकतेच एका उत्साही सोहळ्यात पार पडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयटीआयचे प्राचार्य वीरेंद्र पोटदुखे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. विवेक तेला उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली.औद्योगिक प्रशिक्षण संस्था वरोरा येथे करण्यात आले आहे.
आरोग्य आणि स्वच्छतेचे महत्त्व
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. विवेक तेला यांनी विद्यार्थिनींना मासिक पाळीच्या काळातील आरोग्याची काळजी आणि स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. रोटरी क्लब वरोराचे अध्यक्ष योगेश डोंगरवार यांनी आपल्या भाषणात रोटरीच्या सेवाभावी कार्याचा आढावा घेत, विद्यार्थिनींच्या आरोग्य व सन्मानासाठी अशा उपक्रमांची काळाची गरज असल्याचे अधोरेखित केले.
मशिनचा वापर आणि मार्गदर्शन
प्रकल्प प्रमुख सौ. दीपाली माटे यांनी वेंडिंग मशीनचे प्रात्यक्षिक सादर केले. मशीनचा वापर कसा करावा आणि त्याची देखभाल कशी करावी, याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली. या सुविधेमुळे विद्यार्थिनींना ऐनवेळी होणारी गैरसोय टळणार असून, त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार आहे.
याप्रसंगी इखे सर, दारव्हाणकर सर, रोटेरियन अदनान सद्दीकोट, अभिजित बोथले यांच्यासह आयटीआयचे शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोटरी क्लब वरोराच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
“सुरक्षित आरोग्य, स्वच्छता आणि आत्मविश्वास  प्रत्येक मुलीचा अधिकार!”