चंद्रपूर :- वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या अधिकृत उमेदवाराने आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. विकासकामांचा धडाका आणि मजबूत संघटनशक्तीच्या जोरावर श्री. अरुणजी लखानी यांनी मैदानात उतरत विरोधकांना थेट आव्हान दिले आहे.
माता महाकालीच्या चरणी नतमस्तक, विजयाची ग्वाही
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी श्री. लखानी यांनी चंद्रपूरचे आराध्य दैवत माता महाकालीच्या मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतले. विजयाचा संकल्प करत त्यांनी महायुतीच्या महाविजयाची नांदी केली. यावेळी उपस्थित जनसमुदायाचा उत्साह पाहून, विरोधकांच्या गोटात खळबळ उडाली आहे.
महायुतीची वज्रमुठ; दिग्गज नेत्यांची अभूतपूर्व गर्दी
या महत्त्वपूर्ण प्रसंगी महायुतीचे सर्व दिग्गज नेते एकाच मंचावर एकवटले होते. निवडणुकीचे प्रमुख तथा राज्यमंत्री मा. श्री. पंकजजी भोयर , पालकमंत्री प्रा. डॉ. अशोकजी उईके आणि विकासपुरुष मा. श्री. हंसराजजी भैय्या अहीर यांच्या उपस्थितीने महायुतीची ताकद अधिकच प्रबळ झाली आहे.
मैदानात उतरले ‘विकास’समर्थक.
उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थित असलेल्या आमदारांची मांदियाळी लक्षवेधी ठरली:
आमदार किशोरभाऊ जोरगेवार, देवरावजी भोंगळे, बंटीभाऊ भांगडिया आणि लोकप्रिय आमदार करणदादा देवतळे यांच्यासह महायुतीचे सर्व लोकप्रतिनिधींनी श्री. लखानी यांना शुभेच्छा दिल्या.
“आम्ही विजयाचे उमेदवार, विकासाची आमची धार”
“विकासाभिमुख नेतृत्व आणि जनतेचा अढळ विश्वास हीच आमची खरी ताकद आहे,” असे प्रतिपादन करत महायुतीच्या नेत्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. यावेळी श्री. उमेंद्रजी कोटेकर, रामदासजी तडस, अतुलजी देशकर, देवरावजी होळी, अशोकजी नेते, राजेशजी बकाने, श्रीकांतजी भारती, मिलिंदजी नारोडे, सुधीरजी दिवे, संगीताताई धांडेकर, अविनाशजी वारजूरकर, सुदर्शनजी निमकर यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून सोडला होता.
आता या निवडणुकीत महायुतीची विजयी घोडदौड कशी असेल, याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.
Home Breaking News वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीत महायुतीचे ‘शक्तिप्रदर्शन’; अरुण लखानी यांनी भरला उमेदवारी अर्ज; विजयाचा महामेरू निश्चित!




