चंद्रपूर विधान परिषद निवडण
चंद्रपूर :-महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री. शैलेश अग्रवाल यांनी आज चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज मोठ्या थाटामाटात दाखल केला. यावेळी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांसह कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.
ऐतिहासिक विजयाचा संकल्प.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या ‘कार्यकर्ता मार्गदर्शन सभेत’ महाविकास आघाडीच्या एकजुटीचे दर्शन घडले. या सभेला संबोधित करताना नेत्यांनी आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय निश्चित असल्याचे ठामपणे सांगितले. कार्यकर्त्यांमधील उत्साह पाहून हा विजय ऐतिहासिक असेल, असा दृढ विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष आता पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीच्या मैदानात उतरले असून, विजयासाठी कंबर कसली आहे.
-: दिग्गज नेत्यांची उपस्थिती :-
या महत्त्वपूर्ण प्रसंगी महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती होती. यामध्ये प्रामुख्याने: चंद्रपूर-चे लोकप्रिय खासदार प्रतिभाताई धानोरकर व मा. श्री. विजय वडेट्टीवार (काँग्रेस नेते व आमदार)मा. श्री. रणजित कांबळे (माजी मंत्री)
श्री. सुभाष धोटे (काँग्रेस जिल्हाध्यक्ष)
श्री. संदीप गिऱ्हे (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)
श्री. राजेंद्र वैद्य (राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्ष जिल्हाध्यक्ष) श्री. शिवा राव (शहराध्यक्ष)
यांच्यासह श्री. विनायक बांगडे, श्री. सुभाष गौर आणि महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख पदाधिकारी व निष्ठावंत कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीने व उत्साहाने उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया एक शक्तीप्रदर्शन ठरली.
आगामी काळात महाविकास आघाडीची ही एकजूट मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व पदाधिकारी आता कामाला लागले आहेत.




