Home Breaking News मौजा पोवणी येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि नागरिकांनी लोकप्रिय आमदार देवराव भोंगळे  यांची...

मौजा पोवणी येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि नागरिकांनी लोकप्रिय आमदार देवराव भोंगळे  यांची भेट घेऊन वेकोलिकडून सुरू असलेल्या पुनर्वसन प्रक्रियेबाबत सविस्तर चर्चा केली.

 

राजुरा :- जनसंपर्क कार्यालयात मौजा पोवणी येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि नागरिकांनी लोकप्रिय आमदार देवराव भोंगळे  यांची भेट घेऊन वेकोलिकडून सुरू असलेल्या पुनर्वसन प्रक्रियेबाबत सविस्तर चर्चा केली.
वेकोलि बल्लारपूर क्षेत्रांतर्गत गावाच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू असून, गावातील एकूण ४०५ हेक्टर शेतजमिनीपैकी ३२७ हेक्टर जमीन यापूर्वीच अधिग्रहीत करण्यात आली आहे. मात्र, उर्वरित १४% म्हणजेच ७४ हेक्टर अत्यल्प जमिनीवर शेती करणे आणि उदरनिर्वाह करणे आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत कठीण झाले आहे.
गावाभोवती पसरलेल्या खदाणींमुळे शेतीची मशागत आणि सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असल्याने, वेकोलिने ही उर्वरित शेतजमीन देखील त्वरित अधिग्रहीत करावी, याचसोबत पोवणी गावाचे पुनर्वसन अत्यंत सुव्यवस्थित आणि नियोजनबद्ध पद्धतीने व्हावे, अशा मागण्या ग्रामस्थांनी केल्या आहेत.

यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते निलकंठ (बाबा) कावळे, सरपंच पांडुरंग पा. पोटे, नगरसेवक प्रफुल कावळे, विजय फुलझेले, तेजस्विनी कावळे, माजी सरपंच आशा कावळे, माजी उपसरपंच सुरेश झाडे, विनायक साळवे, भूषण कावळे, सुरेंद्र डाहूले, शामराव लोहे आणि पोवणी येथील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🙏 जय विदर्भ 🙏