वणी :- वणी विधानसभा क्षेत्रात सध्या राजकीय वारे वेगाने वाहू लागले असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मतदारसंघात मोठी मुसंडी मारली आहे. मनसे नेते राजु उंबरकर यांच्या झंझावाती कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून वणीतील असंख्य तरुण कार्यकर्त्यांनी आज ‘राजमुद्रा’ या निवासस्थानी जाहीर पक्षप्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे वणी शहरात मनसेची ताकद कित्येक पटीने वाढली असून विरोधकांच्या गोटात मात्र अस्वस्थता पसरली आहे.
‼️आक्रमक कार्यपद्धतीचा प्रभाव‼️
हिंदू जननायक माननीय राजसाहेब ठाकरे यांचा ‘महाराष्ट्र धर्म’ आणि राजुभाऊ उंबरकर यांची वणी क्षेत्रातील जनसामान्यांसाठी धावून जाण्याची वृत्ती, याला भाळून तरुणांनी मनसेचा झेंडा हाती धरला आहे. “राजसाहेबांची विकासाची दृष्टी आणि राजुभाऊंची आक्रमक कार्यशैलीच वणीचा कायापालट करू शकते,” अशी भावना यावेळी नवनियुक्त कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
‼️मनसे नेते राजु उंबरकर विजयाचे रणशिंग‼️
या सोहळ्यात नसे नेते राजु उंबरकर यांनी सर्व कार्यकर्त्यांचे मनसेचा अधिकृत झेंडा आणि शाल देऊन स्वागत केले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले:
👉”वणी परिसरातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि इथल्या सर्वांगीण विकासासाठी मनसे शेवटच्या श्वासापर्यंत कटिबद्ध आहे. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आता तरुणांची ही फळी सज्ज झाली असून, हा केवळ पक्षप्रवेश नसून वणीच्या परिवर्तनाची ही नांदी आहे.”
🙏प्रमुख उपस्थिती🙏
या पक्षप्रवेशावेळी मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. फाल्गुन गोहोकार यांनीही कार्यकर्त्यांच्या या उत्साहाचे कौतुक करत, आगामी काळात मनसे घराघरात पोहोचवण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले.
👉 ठळक वैशिष्ट्ये :- असंख्य तरुणांचा सहभाग वणी शहरातील विविध प्रभागांतील तरुणांची मोठी उपस्थिती.राजसाहेबांच्या विचारांची प्रेरणा महाराष्ट्राच्या विकासाच्या आराखड्यावर तरुणांचा विश्वास.
👉 विजयाचा निर्धार :- वणी विधानसभा क्षेत्रात मनसेचे वर्चस्व निर्माण करण्याचा कार्यकर्त्यांचा संकल्प.
🙏 जय विदर्भ 🙏




