Home Breaking News शेगाव(बु) पोलिसांची धडक कारवाई! लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीची छेडछाड करणाऱ्या नराधमाला...

शेगाव(बु) पोलिसांची धडक कारवाई! लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीची छेडछाड करणाऱ्या नराधमाला अवघ्या २४ तासांत अटक.

शेगाव (बु):- टेमुर्डा येथे शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन मुलीला दुचाकीवर लिफ्ट देण्याच्या बहाण्याने छेडछाड करून पळून गेलेल्या अज्ञात आरोपीला शेगाव पोलिसांनी तांत्रिक तपास आणि खबऱ्यांच्या मदतीने अवघ्या २४ तासांत शोधून अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी देखील जप्त केली असून, पोलिसांच्या या तत्पर व कौशल्यपूर्ण कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.



दिनांक २९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास टेमुर्डा येथे पीडित मुलगी शाळेत जात असताना एका दुचाकीस्वाराने तिला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने आपल्या दुचाकीवर बसविले. काही अंतर पुढे गेल्यानंतर त्याने तिची छेड काढल्याने घाबरलेल्या पीडित मुलीने चालत्या दुचाकीवरून उडी घेतली. या घटनेत तिला दुखापत झाली, त्यानंतर दुचाकीस्वार तेथून पसार झाला. या प्रकरणी शेगाव पोलीस ठाण्यात अप. क्र. २६५/२०२६ अन्वये कलम ७४ बीएनएस तसेच POCSO कायदा २०१२ मधील कलम १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.



तातांत्रिक तपास आणि खबऱ्यांच्या मदतीने छडा
गुन्हा दाखल होताच शेगाव (बु) पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी तांत्रिक तपास, प्रत्यक्ष शोधमोहीम आणि खबऱ्यांच्या माहितीच्या आधारे वेगाने चक्र फिरवली. कोणतीही ठोस माहिती हाती नसताना पोलिसांच्या अथक प्रयत्नांना यश आले आणि अवघ्या २४ तासांच्या आत आरोपीची ओळख पटवून त्याला ताब्यात घेण्यात आले.
💥 आरोपीचे नाव :- गणेश बाळूराम कुमावत (वय ३४) सध्याचे ठिकाण :- बोर्डा, ता. वरोरा,मूळ गाव  बासडी खुर्द, जि. जयपूर, राजस्थान



🙏 वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व पथक 🙏
ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसर यांच्या मार्गदर्शनाखाली शेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक तथा थानेदार योगेंद्रसिंग यादव यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.या यशस्वी कारवाईत पोलीस उपनिरीक्षक दिलीप पोले, पोलीस उपनिरीक्षक सुमित कांबळे, सफौ दिलीप सुर, पोलीस हवालदार अविनाश तुरणकर, दिनेश ताटेवार तसेच पोलीस शिपाई प्रशांत गिरडकर यांनी सहभाग घेतला.