घुगुस :-“एकीकडे घुग्घुस शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रचंड तुटवडा आहे, नळ बंद आहेत, नागरिक टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. शहरात घाणीचे साम्राज्य पसरले असून डेंगूचा धोका वाढला आहे. पथदिवे बंद असल्याने नागरिक अंधारात चाचपडत आहेत. अशा गंभीर परिस्थितीत जनतेला वाऱ्यावर सोडून घुग्घुस नगरपरिषदेचे सत्ताधारी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक मात्र प्रशिक्षणाच्या नावाखाली गोव्यात मौजमजा करायला गेल्याचा खळबळजनक आरोप आता विरोधकांनी केला आहे!”
👉 मुख्य मुद्दे :-२० लाख रुपयांची उधळपट्टी : “प्रशिक्षणासाठी महाराष्ट्रात चंद्रपूर, नागपूर, पुणे, मुंबई अशी नामांकित केंद्रे असताना, थेट गोव्याचीच निवड का करण्यात आली ? गोव्याच्या समुद्रात असे कोणते विशेष प्रशिक्षण मिळते ?” असा संतप्त सवाल आंदोलकांनी उपस्थित केला आहे.
👉 सहपरिवार सहल :-“जनतेच्या करातून गोळा झालेल्या तब्बल २० लाख रुपयांचा चुराडा करत, हे लोक इनोव्हा गाड्यांमधून सहपरिवार गोव्याला फिरण्यासाठी गेले आहेत.”
👉 ‘गो गोवा’ आंदोलन : “नगरपरिषदेच्या या बेजबाबदार कारभाराविरोधात नागरिकांनी आणि विरोधकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, ‘गो गोवा’ आंदोलनाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यात येत आहे.”
👉 आवाहन :-“शहराचा विकास करायचा सोडून जर नगरपरिषद केवळ मौजमजेची जागा बनत असेल, तर नागरिकांनी आता जागे होण्याची वेळ आली आहे. आपल्या हक्काच्या पैशांचा असा अपव्यय करणाऱ्या लोकप्रतिनिधींना जनतेने जाब विचारलाच पाहिजे!”
🙏 जय विदर्भ 🙏




