Home विदर्भ प्रदूषणावर प्रहार! मंत्री पंकजा मुंडे यांचा चंद्रपूर दौरा; उद्योगांचे धाबे दणाणले ?

प्रदूषणावर प्रहार! मंत्री पंकजा मुंडे यांचा चंद्रपूर दौरा; उद्योगांचे धाबे दणाणले ?

कोरपना  :- उद्या चंद्रपूर जिल्ह्यातील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे उद्या, गुरुवारी जिल्ह्याचा झंझावाती दौरा करणार आहेत. औद्योगिक प्रदूषणामुळे त्रस्त असलेल्या चंद्रपूरकरांच्या नजरा या दौऱ्याकडे लागल्या असून, दोषी उद्योगांवर कठोर कारवाईचे संकेत मिळत आहेत.
🛑 दौऱ्याचा मुख्य उद्देश👇
मंत्री पंकजा मुंडे या प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन प्रदूषणाची पाहणी करणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने:
🔴 विविध औद्योगिक प्रकल्पांना भेटी देऊन प्रदूषणाच्या स्थितीचा आढावा घेणे.
🔴 उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन उपाययोजनांवर चर्चा करणे.
🔴 प्रदूषणग्रस्त भागातील नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणे.
🔴 पशुपालकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना मार्गदर्शन करणे.असा असेल मंत्री महोदयांचा दौरा (वेळापत्रक) :- 👇 वेळ- ठिकाण -कार्यक्रम 👇

👉 सकाळी 9 वाजता वरोरा – भद्रावती निर्वाचन क्षेत्राचे लोकप्रिय आमदार करणदादा देवतळे यांच्या पुष्पांजली निवासस्थानी भेट देनार आहे.

👉 सकाळी 11:00 चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन, दुर्गापूर येथे भेट

👉 दुपारी 12:00 बेलसणी येथील कोल वॉशरीची पाहणी

👉 दुपारी 02:30 झरपट आणि इरई नदी प्रदूषणाची पाहणी

👉 दुपारी 04:00 गडचांदूर येथे आगमन

👉 सायंकाळी 05:00 अल्ट्राटेक सिमेंट, माणिकगड प्रकल्पाला भेट

👉 सायंकाळी 06:00  बोटॅनिकल गार्डन, विसापूर येथे कार्यक्रम

👉 रात्री 07:30 ताडोबा राष्ट्रीय उद्यानाकडे प्रस्थान

🔴 नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या 🔴
या दौऱ्यामुळे नियम धाब्यावर बसवणाऱ्या उद्योगांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. प्रशासकीय स्तरावर कठोर निर्णयांची अंमलबजावणी झाल्यास चंद्रपूरच्या प्रदूषणाचा प्रश्न मार्गी लागेल, अशी आशा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
🔴थोडक्यात पण महत्त्वाचे🔴

हा दौरा केवळ औपचारिक न राहता, प्रदूषणाविरुद्ध ठोस कृतीचा आरंभ ठरणार का  ?  याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

🙏 जय विदर्भ 🙏