” माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज (भैय्या)अहीर यांच्या वाढदिवसानिमित्त घोरपेड त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन”
घोडपेड :- राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री मा. श्री. हंसराज (भैय्या) अहीर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून घोरपेड येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ११ नोव्हेंबर २०२६ रोजी भारतीय जनता पार्टी (घोरपेड शाखा) आणि कमल स्पोर्टिंग क्लब यांच्या वतीने हे उपक्रम राबवण्यात येणार आहेत.
दूध वाटप कार्यक्रम :- भारतीय जनता पार्टी, घोरपेड शाखेतर्फे सकाळी ९:०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक (बस स्टँड), घोरपेड येथे दूध वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
फळ वाटप कार्यक्रम :- कमल स्पोर्टिंग क्लब, घोरपेड यांच्या सौजन्याने सकाळी ११:०० वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र, घोडपेठ येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात येणार आहे.
या दोन्ही सामाजिक उपक्रमांना परिसरातील नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते व युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजप घोरपेड शाखा व कमल स्पोर्टिंग क्लबच्या वतीने करण्यात आले आहे.





