वरोरा :- राजकारणात आणि समाजकारणात वाढदिवस म्हणजे फ्लेक्स, बॅनर्स, फटाके आणि मोठा गाजावाजा हे समीकरण आता सर्वसामान्य झाले आहे. मात्र, या सगळ्याला फाटा देत वरोरा नगरपालिकेचे लोकप्रिय नगरसेवक श्री. बंडूभाऊ देऊळकर यांनी आपल्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त एक नवा आणि प्रेरणादायी पायंडा पाडला आहे. कोणताही बडेजाव न करता त्यांनी आपला वाढदिवस थेट नगरपालिकेच्या सफाई कर्मचारी आणि सर्वसामान्य कर्मचाऱ्यांसोबत अतिशय साधेपणाने साजरा केला.
शहराची स्वच्छता अहोरात्र राखणाऱ्या आणि आरोग्याची काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कष्टाची जाणीव ठेवत, बंडूभाऊंनी त्यांच्याच उपस्थितीत केक कापून आनंद साजरा केला. या अनोख्या उपक्रमामुळे कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला, तर नागरिकांमधून त्यांच्या या साधेपणाचे जोरदार कौतुक होत आहे.
आजच्या काळात वाढदिवसावर होणारी उधळपट्टी टाळून समाजाला एक सकारात्मक संदेश देण्याचे काम बंडूभाऊ देऊळकर यांनी केले आहे. त्यांच्या या सामाजिक जािणिवेच्या आणि साध्या विचारांच्या वाढदिवसाबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
आपल्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त श्री. बंडूभाऊ देऊळकर यांना मनःपूर्वक शुभेच्छा!





