वरोरा :- शहरात आणि परिसरामध्ये मुक्या जनावरांवर संकट ओढवल्यावर मदतीचा हात देणाऱ्या एका तरुण गटाने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. केवळ एका हाकेवर धावून जात या तरुणांनी आजवर गाय, कुत्रा, मांजर, बगळा आणि चिमणी अशा अनेक मुक्या प्राण्यांचे प्राण वाचवले आहेत. या कार्याची गावकऱ्यांनाही साक्ष आहे, मात्र आता हे सेवाकार्य सुरू ठेवण्यासाठी या तरुणांसमोर आर्थिक अडचणी उभे ठाकल्या आहेत.
उपेक्षेमुळे कार्याला कात्री लागण्याची भीती
आजवर अनेक लोकांकडे मदतीसाठी हात पसरले, परंतु अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे उपचाराचा खर्च आणि औषधपाण्याची सोय कशी करायची, असा गंभीर प्रश्न या वन्यजीव व प्राणीप्रेमींसमोर निर्माण झाला आहे. “मुक्या प्राण्यांचा जीव वाचवण्याचा हा यज्ञ असाच अविरत सुरू राहावा, यासाठी गावकऱ्यांनी आणि दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने मदत करावी,” अशी आर्त हाक या तरुणांनी दिली आहे.
“आम्ही प्राण्यांचे प्राण वाचवण्यासाठी जीवाचे रान करत आहोत, पण उपचाराचा खर्च आता पेलवत नाही. आपल्या एका छोट्याशा मदतीमुळे अनेक मुक्या जिवांना नवीन आयुष्य मिळू शकते.” प्राणीमित्र गट, वरोरा
🙏 आपले सहकार्य कसे मोलाचे ठरेल 🙏
- औषधोपचार व बँडेजसाठी निधी :- जखमी जनावरांवर तातडीने वैद्यकीय उपचार करण्यासाठी.
- खाद्य व निवारा व्यवस्था :- आपत्कालीन स्थितीत आणलेल्या जनावरांच्या पोषणासाठी.
- वाहतूक खर्च :- घटनास्थळी तात्काळ पोहोचण्यासाठी लागणारे वाहन भाडे.
आव्हानात्मक काळात या सामाजिक कार्यास हातभार लावण्यासाठी पुढे या. जर आपल्याला या सत्कार्यात सहभागी होऊन मदत करायची असेल, तर खालील क्रमांकावर संपर्क साधावा:
- संपर्क क्रमांक: [8668969716]





