माढेळी :- होमिओपॅथीचे जनक डॉ.साम्यूल हनिमून यांच्या जयंतीचे औचित्य साधून वरोरा तालुका होमिओपॅथिक डॉक्टर संघटनेचे नवीन कार्यकारिणीची निवड 10 एप्रिल ला सिद्धकला लाँन येथील सभेत करण्यात आली व यामध्ये माढळीचे डॉ. अतुल भेदुरकर यांची अध्यक्षपदी तर डॉ. देवाळकर यांची सचिव पदी एकमताने निवड करण्यात आली.
होमिओपॅथीचे जनक डॉ. साम्यूल हनीमन यांच्या जयंतीचे आयोजन होमिओपॅथिक डॉक्टर संघटने कडून सिद्धकला लॉन्,वरोरा येथे करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र ढवस हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. महानकर, डॉ. बुरान, डॉ. गुणानंद दुर्गे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात डॉ. साम्यूल हनिमून यांच्या जीवनपटावर डॉ. मेश्राम व इतर मान्यवरांनी प्रकाश टाकला. दरम्यान वरोरा तालुका होमिओपॅथिक डॉक्टर संघटनेची नवीन कार्यकर्णीची निवड करण्यात आली यात अध्यक्ष डॉ. अतुल भेदुरकर, उपाध्यक्ष डॉ. राकेश पिंपळकर, सचिव डॉ. सुमित देवाळकर, कोषाध्यक्ष डॉ. अमित झिले, सहसचिव डॉ. रंजन पिजदुरकर व महिला प्रतिनिधी म्हणून डॉ. निशा वैद्य आदींची निवड करण्यात आली यावेळी वरोरा आणि भद्रावती तालुक्यातील डॉ. वैभव कष्टी, डॉ. रवींद्र डोरलीकर, डॉ. कोटेचा , डॉ. गंपावार, डॉ. कुशल डोरलीकर, डॉ. पद्युम बोबडे, डॉ. कमलेश वैरागडे, डॉ. विपिन चांदेकर, डॉ. हरबडे मॅडम, डॉ. चवले मॅडम, डॉ. झाडे मॅडम आदि होमिओपॅथिक डॉक्टर यांची उपस्थिती होती या संघटनेमार्फत दरवर्षी रक्तदान शिबिर, होमिओपॅथिक औषधी वितरण, रक्त तपासणी व आरोग्य विषयक मार्गदर्शन असे वेगवेगळे सामाजिक व आरोग्य सुधारणा विषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नितीन पाटील, तर आभार प्रदर्शन डॉ. मयूर देवाळकर यांनी केले.
🙏 जय विदर्भ 🙏




