6 November 2026News Website

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शिवसेनेचा भगवा फडकल्याने ‘मातोश्री’वर जल्लोष; उद्धव ठाकरेंनी दिला शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा संदेश!

मुंबई/यवतमाळ :- यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने दणदणीत विजय मिळवत सहकार क्षेत्रात आपला दबदबा पुन्हा एकदा सिद्ध केला आहे. या ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण यशाबद्दल पक्षाचे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा. श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांची मुंबई येथील ‘मातोश्री’ निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन नवनियुक्त संचालक आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले.



‘मातोश्री’वर यवतमाळच्या शिष्टमंडळाची गर्जना वणी विधानसभेचे लोकप्रिय आमदार श्री. संजयजी देरकर यांच्या नेतृत्वाखाली यवतमाळ जिल्ह्यातील नवनियुक्त संचालक आणि मुख्य पदाधिकाऱ्यांनी उद्धवजी ठाकरे यांची भेट घेतली. बँकेतील विजय हा सहकार क्षेत्रातील निष्ठावंत शिवसैनिकांच्या कष्टाचे आणि पक्षसंघटनेच्या ताकदीचे फलित असल्याचे सांगत उद्धवजी ठाकरे यांनी सर्व नवनियुक्त संचालकांचे कौतुक केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहा – उद्धव ठाकरे या महत्त्वपूर्ण भेटीदरम्यान यवतमाळ जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भातील सध्याची दुष्काळजन्य परिस्थिती आणि शेतकरी राजाच्या ज्वलंत समस्यांवर आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. दुष्काळाच्या सावटात सापडलेल्या बळीराजाला तातडीने दिलासा मिळणे गरजेचे असल्याचे सांगत साहेबांनी “प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा!” अशा स्पष्ट सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या. साहेबांना अभिप्रेत असलेला प्रत्येक शिवसैनिक या कठीण काळात बळीराजाच्या पाठीशी ढाल बनून उभा राहील, असा ठाम विश्वास यावेळी आमदार संजयजी देरकर व उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.



दीपावलीच्या दिल्या मनःपूर्वक शुभेच्छा या भेटीदरम्यान दिवाळीच्या पावन पर्वानिमित्त मा. श्री. उद्धवजी ठाकरे साहेबांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच यवतमाळ जिल्ह्यातील आगामी राजकीय वाटचाल, पक्षसंघटन अधिक आक्रमक व मजबूत करणे आणि भविष्यातील राजकीय रणनीतीबाबत सकारात्मक व सखोल मार्गदर्शन उद्धवजी ठाकरेंकडून घेण्यात आले.



शिवसेनेच्या दिग्गजांची उपस्थिती या प्रसंगी शिवसेना नेते तथा खासदार मा. श्री. अरविंदजी सावंत साहेब, वणी विधानसभेचे आमदार श्री. संजयजी देरकर साहेब, संपर्कप्रमुख श्री. अनिलजी आगळे, नवनियुक्त संचालिका सौ. किरणताई देरकर, संचालक श्री. सुनीलजी कातकडे, जिल्हा संपर्क प्रमुख श्री. राजेंद्रजी गायकवाड, जिल्हाप्रमुख श्री. किशोरजी इंगळे, श्री. संजयजी निखाडे, श्री. प्रवीणजी शिंदे, उपजिल्हाप्रमुख श्री. शरदजी ठाकरे, श्री. अविनाश भुजबळराव, वणी तालुकाप्रमुख श्री. संतोषजी कुचनकर, मारेगाव तालुकाप्रमुख श्री. पुरुषोत्तमजी बुटे, झरी तालुकाप्रमुख श्री. सतीशजी आदेवार, श्री. किशोर थेरे, श्री. अमोल कुचनकर यांच्यासह पक्षाचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



सहकार क्षेत्रातील अभूतपूर्व यश, संघटनेची आक्रमक ताकद आणि पक्षनिष्ठेच्या बळावर आगामी काळात यवतमाळ जिल्ह्यात शिवसेनेची घोडदौड अधिक सक्षम व गतीमान करण्याचा निर्धार या प्रसंगी सर्व शिवसैनिकांनी व्यक्त केला.

 

अभिषेक किशोर भागडे