मेरठ :- देशभर गाजलेल्या उत्तर प्रदेशातील मेरठच्या बहुचर्चित ‘नीला ड्रम’ हत्या प्रकरणात जिल्हा न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. न्यायालयाने मृत सौरभ राजपूतची पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांना हत्येचा दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली आहे.
अदालतीने हे प्रकरण ‘सर्वात दुर्मिळातील दुर्मिळ’ (Rarest of Rare) श्रेणीतील मानून हा कठोर निर्णय घेतला आहे.
💥 काय होते प्रकरण 💥
- हत्येची तारीख :- मार्च २०२५ मध्ये मर्चंट जहाजाचे माजी कर्मचारी असलेल्या सौरभ राजपूतची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.
- मृतदेहाची विल्हेवाट :- हत्येनंतर सौरभच्या मृतदेहाचे तुकडे करून ते एका निळ्या रंगाच्या प्लास्टिक ड्रममध्ये सिमेंट-वाळू टाकून लपवून ठेवण्यात आले होते.
- तपास आणि खटला :- याप्रकरणी पोलिसांनी १९ मार्च २०२५ रोजी मुस्कान आणि साहिलला अटक केली होती. या प्रकरणाचा खटला जुलै २०२५ मध्ये सुरू झाला, जो सुमारे १३ महिने चालला. या काळात १२६ सुनावण्या झाल्या आणि २२ हून अधिक साक्षीदारांचे जबाब नोंदवले गेले.
अदालतीने ३० सप्टेंबर २०२६ रोजी दोघांना या प्रकरणात दोषी करार दिले होते, आणि आज (१४ ऑक्टोबर २०२६) शिक्षेचे सुनावणी सुनावताना दोघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयाच्या या निर्णयावर मृत सौरभच्या कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले असून याला ‘न्यायाचा विजय’ म्हटले आहे.




