7 November 2026News Website

‘ प्रतीकात्मक रावण दहना ‘तून होणार समाजकंटकांचा अन् सामाजिक दुष्प्रवृत्तींचा खात्मा!

आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद व राष्ट्रीय बजरंग दलातर्फे भव्य कार्यक्रमाचे आयोजन; अनूप जायसवाल यांचे जोरदार आवाहन!

बोरगाव (विशेष प्रतिनिधी) :-सत्य, धर्म आणि सदाचाराचा विजय साजरा करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, राष्ट्रीय बजरंग दल आणि नवदुर्गा सोशल सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रतीकात्मक रावण दहन’ कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

हा भव्य सोहळा मंगळवार, दिनांक २० ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता गणेश नगर, बोरगाव जवळील कोचर जीन शेजारी पार पडणार आहे.

केवळ पुतळा दहन नाही, तर वाईट प्रवृत्ती नष्ट करण्याचा संकल्प!

राष्ट्रीय बजरंग दल विदर्भ प्रांत अध्यक्ष अनूप एस. जायसवाल यांनी या प्रसंगी जनतेला अत्यंत आक्रमक आणि खणखणीत आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले की, “दसरा हा केवळ रावणरुपी पुतळ्याचे दहन करण्याचा सण नाही, तर समाजाला लागलेली अनिष्ट प्रवृत्तींची कीड समूळ नष्ट करण्याचा दिवस आहे. रावणाकडे अफाट ज्ञान आणि शक्ती होती, परंतु अहंकार, क्रोध आणि वाईट आचरणामुळे त्याचा अंत झाला. आज आपल्या समाजात फोफावणारे आतंकवाद, भ्रष्टाचार, लव्ह जिहादची मानसिकता, गोवंश हत्या, व्यसनाधीनता, भ्रूणहत्या, अंधश्रद्धा आणि हुंडाबळी यांसारख्या सामाजिक वाईट प्रवृत्तींचा अंत करणे हीच खरी काळाची गरज आहे.”

सामाजिक दुष्प्रवृत्तींवर प्रहार!

कार्यक्रमाच्या आयोजकांनी “वाईटाचा अंत हाच खऱ्या चांगल्या समाजाची सुरुवात आहे” हा ठाम संदेश दिला आहे. अहंकाराचा दहन करून सत्य, प्रेम आणि चांगुलपणाच्या मार्गावर चालण्याचा संकल्प या सोहळ्याच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

बोरगाव व परिसरातील तमाम नागरिक, धर्मप्रेमी बंधू-भगिनींनी या भव्य रावण दहन कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे जोरदार आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

कार्यक्रम तपशील :-

  • दिनांक :- मंगळवार, २० ऑक्टोबर २०२६
  • वेळ :-सायंकाळी ५.३० वाजता
  • स्थळ :- गणेश नगर, बोरगावजवळ (कोचर जीनच्या बाजूला)
  • आयोजक :- आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, राष्ट्रीय बजरंग दल व नवदुर्गा सोशल सांस्कृतिक क्रीडा मंडळ, त. जिल्हा.वर्धा

अभिषेक किशोर भागडे