7 November 2026News Website

दुष्काळग्रस्त शेतकरी, पीकविमा आणि क्रीडा संकुलासाठी आमदार प्रा. राजूभाऊ तोडसाम यांचा दमदार पुढाकार!

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा मिळण्याची आणि पांढरकवडा क्रीडा संकुलासाठी कृषी जमीन उपलब्ध करून देण्याची कृषिंत्र्यांकडे आग्रही मागणी

 पांढरकवडा :- यवतमाळ जिल्ह्यातील गंभीर दुष्काळग्रस्त परिस्थिती, शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा मिळण्याचा प्रश्न तसेच पांढरकवडा येथील क्रीडा संकुलासाठी कृषी विभागाची जमीन उपलब्ध करून देण्याच्या अत्यंत महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी माजी आमदार प्रा. श्री. राजूभाऊ तोडसाम यांनी महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री मा. श्री. दत्तामामा भरणे साहेब यांची विशेष भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी राज्याचे कृषिमंत्री यांना सविस्तर निवेदन सादर करत या ज्वलंत प्रश्नांवर तातडीने लक्ष घालण्याची आग्रही मागणी केली आहे.

शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम भूमिका

सध्या यवतमाळ जिल्ह्यात दुष्काळामुळे शेतकरी वर्ग अत्यंत हलाखीच्या आणि आर्थिक संकटात सापडला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून, बळीराजा उद्ध्वस्त झाला आहे. अशा बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांना योग्य ती शासकीय मदत, आर्थिक दिलासा आणि तातडीने पुनर्वसन मिळण्याची गरज प्रा. राजूभाऊ तोडसाम यांनी कृषीमंत्र्यांसमोर मांडली. तसेच, जिल्ह्यातील पात्र व बाधित शेतकऱ्यांना कोणत्याही निकषांच्या अटीविना सरसकट पीकविमा तात्काळ मंजूर करण्यात यावा, अशी आक्रमक आणि ठाम मागणी त्यांनी केली.

युवकांच्या क्रीडा विकासासाठी पांढरकवडा येथे क्रीडा संकुल

केवळ शेतकरीच नव्हे, तर ग्रामीण भागातील व पांढरकवडा परिसरातील होतकरू खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे, यासाठी क्रीडा विकासाचा मुद्दाही या बैठकीत प्रकर्षाने मांडण्यात आला. पांढरकवडा येथील खेळाडूंना दर्जेदार क्रीडा सुविधा व प्रशिक्षण उपलब्ध व्हावे, यासाठी भव्य क्रीडा संकुल उभारण्यात यावे. या क्रीडा संकुलाच्या उभारणीसाठी कृषी विभागाची आवश्यक जमीन विनाविलंब हस्तांतरित करावी, अशी महत्त्वाची मागणी करण्यात आली, जेणेकरून येथील तरुणांच्या क्रीडागुन्हांना योग्य वाव मिळेल.

जनहितासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा

शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांपासून ते युवकांच्या क्रीडा सुविधांपर्यंत, सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या प्रत्येक विषयासाठी आमदार प्रा. राजूभाऊ तोडसाम यांचा हा सातत्यपूर्ण पाठपुरावा परिसतात कौतुकाचा विषय ठरत आहे. कृषीमंत्र्यांनीही या सर्व मागण्यांवर सकारात्मक विचार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

 

 

अभिषेक किशोर भागडे