6 November 2026News Website

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे जोरदार तयारी: वरोरा विधानसभा मतदारसंघात समन्वयक म्हणून विलास धर्माजी नेरकर यांची नियुक्ती!

वरोरा (प्रतिनिधी) :-  आगामी निवडणुका आणि मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (S.I.R.) कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने संघटनात्मक बांधणी अधिक तीव्र केली आहे. याचाच एक भाग म्हणून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांच्या स्वाक्षरीने वरोरा विधानसभा मतदारसंघासाठी विलास धर्माजी नेरकर यांची समन्वयक म्हणून अत्यंत महत्त्वपूर्ण नियुक्ती करण्यात आली आहे.



पक्षाच्या या आक्रमक भूमिकेमुळे आणि तळागाळातील कार्यकर्त्यांवर सोपवलेल्या या नव्या जबाबदारीमुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. मतदार यादीच्या पुनरीक्षणासारख्या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या मोहिमेत विलास नेरकर यांच्याकडे ही धुरा आल्यामुळे पक्षाची ताकद वरोरा मतदारसंघात अधिक मजबूत होणार असून, आगामी काळात विरोधकांना तगडे आव्हान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



या नियुक्तीबद्दल विलास धर्माजी नेरकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, ते या जबाबदारीला नक्कीच न्याय देतील आणि पक्षाचा विस्तार तळागाळापर्यंत पोहोचवतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे.

अभिषेक किशोर भागडे