वरोरा :- भाजपला रामराम ठोकत वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक विलासभाऊ झीले यांनी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकृतपणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वावर आणि काँग्रेसच्या सर्वसमावेशक विचारधारेवर पूर्ण विश्वास व्यक्त करत त्यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
💥 शेतकरी आणि कष्टकऱ्यांचा आवाज 💥
सामान्य नागरिक, शेतकरी आणि कष्टकरी वर्गाच्या हक्कासाठी सातत्याने संघर्ष करणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या धोरणांमुळे प्रभावित होऊन झीले यांनी हाती काँग्रेसचा हात घेतला आहे. आगामी काळात या पक्षप्रवेशामुळे वरोरा तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये काँग्रेस पक्षाची ताकद अधिक मजबूत होणार आहे.
💥 प्रमुख मान्यवरांची उपस्थिती 💥
हा पक्षप्रवेश सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. यावेळी दिनेश कष्टी, हरीश जाधव, पुरुषोत्तम पावडे, गणेश चवले आणि प्रवीण काकडे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“हात से हात जोडो… काँग्रेसशी नातं जोडो!”
काँग्रेस परिवारात विलासभाऊ झीले यांचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले असून, त्यांच्या पुढील सर्व राजकीय व सामाजिक वाटचालीस जोरदार शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.




