Home Breaking News वरोरा पोलिसांची मोठी कारवाई: आंबेडकर पुतळ्याजवळ ५२ तास जुगार खेळणाऱ्या ४ जणांवर...

वरोरा पोलिसांची मोठी कारवाई: आंबेडकर पुतळ्याजवळ ५२ तास जुगार खेळणाऱ्या ४ जणांवर छापा, ५,७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त.

Pocket Aces playing Texas Hold'em.

वरोरा :- वरोरा पोलीस स्टेशनच्या पथकाने डायल ११२ वरील कॉलनुसार आंबेडकर पुतळा जवळील श्रीचित कारेकर यांच्या घरासमोर छापा टाकून ५२ तास पत्त्यावर जुगार खेळणाऱ्या ४ जणांवर यशस्वी कारवाई केली आहे. ही कारवाई मंगळवार, दिनांक ०८/०९/२०२६ रोजी करण्यात आली.
असे आहेत आरोपी :-
💥  राजेश दत्तू चिंचोलकर (वय ३७, धंदा- मजुरी, रा. दत्तमंदिर वार्ड, वरोरा)
💥 चंद्रकांत शामराव सोयाम (वय ४७, धंदा- ड्रायव्हर, रा. आझाद वार्ड, वरोरा)
💥 अब्दुल रहीम मेहबूब शेख (वय ६३, धंदा- मजुरी, रा. हनुमान वार्ड, वरोरा)
💥 श्रीचित सुभाशराव कारेकर (वय ३३, धंदा- मजुरी, रा. आंबेडकर चौक, वरोरा)
💥 जप्त करण्यात आलेला मुद्देमाल 💥
आरोपींच्या ताब्यातून ५१२०/- रुपये किमतीचे ५२ तास पत्ते आणि ५४०/- रुपयांची नगदी रोकड असा एकूण ५,७७०/- रुपयांचा मुद्देमाल पंचरनामा करून जप्त करण्यात आला आहे. चारही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू आहे.
🙏 मार्गदर्शन व तपास पथक 🙏
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मा. आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक मा. ईश्वर काटकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी मा. संतोष बाकल आणि पोलीस स्टेशन वरोराचे पोलीस निरीक्षक मा. ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा./९२४ अमोल नवघरे, पो.हवा./२२६३ प्रविण रौराळे, पो.हवा./३१५ संजय गायकवाड व पो.अं./१३९९ मनोज ठाकरे यांनी पार पाडली.