7 November 2026News Website

बावणे मंगल कार्यालयामागे हाहाकार; चोराने तरुणीवर हल्ला करून घरातच डांबले

वरारो :- वरोरा शहरातील दत्त मंदिर वार्ड (मोहबाळा रोड) येथील बावणे मंगल कार्यालयाच्या पाठीमागील परिसरात एका बंद घराजवळ अत्यंत खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ब्रह्मदेव महादेव उरकांडे  यांच्या घरी अज्ञात चोराने कुलूप तोडून भरदिवसा धाडसी चोरी केली. एवढेच नव्हे तर, चोराला रंगेहात रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या कु. प्राची ब्रह्मदेव उरकांडे हिच्यावर हल्ला करत चोराने क्रौर्यतेची सीमा ओलांडली आणि तिला घरातच डांबून पोबारा केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

 💥 घटनेचा थरारक घटनाक्रम 💥

  • कुलूप तोडून आत प्रवेश :-अज्ञात चोराने निर्भयपणे घराचे मुख्य कुलूप तोडून घरात प्रवेश व चोरी केली.
  • तरुणीचा हिंमतीने प्रतिकार :- चोरी सुरू असताना घरात उपस्थित असलेल्या प्राची ब्रह्मदेव उरकांडे ने चोराचा सामना करण्याचा प्रयत्न केला.
  • आक्रमक चोराचा हल्ला :- चोराने क्रूरता दाखवत प्राचीवर अचानक हल्ला केला, ज्यामुळे परिसरात एकच दहशत पसरली आहे.
  • घरात डांबून पळ काढला :- आरडाओरडा होऊ नये म्हणून चोराने पीडित तरुणीला त्याच घरात कोंडून ठेवले आणि लुटलेला माल / रक्कम घेऊन घटनास्थळावरून पळ काढला.

या भयंकर घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये कमालीचा रोष आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. भरवस्तीत किंवा गजबजलेल्या मंगल कार्यालयाजवळ अशा प्रकारे घरात घुसून हल्ला करण्याच्या प्रकारामुळे सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, अज्ञात चोराचा शोध घेण्यासाठी कसून चौकशी सुरू केली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्या नराधम चोराला लवकरात लवकर बेड्या ठोकून गजाआड करावे, अशी जोरदार मागणी संतप्त नागरिकांमधून होत आहे.

 

अभिषेक किशोर भागडे