Home क्राईम स्थानिक गुन्हे शाखेची ब्रम्हपुरी हद्दीत मोठी कारवाई; ५ लाख ६० हजारांचा अवैध...

स्थानिक गुन्हे शाखेची ब्रम्हपुरी हद्दीत मोठी कारवाई; ५ लाख ६० हजारांचा अवैध देशी दारूसाठा व कार जप्त.

ब्रम्हपुरी (दि. ०८) :- ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध देशी दारूची वाहतूक करणाऱ्या एका टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ५ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, गांगलवाडी मार्गे पाथरीकडे एका कारमधून अवैध दारूची वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा कुडेसावली येथे सापळा रचून पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईदरम्यान आरोपी त्यांच्या ताब्यातील कारमधून अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करताना रंगेहात पकडण्यात आले.
याप्रकरणी ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनमध्ये अप. क्र. ७०१/२६, कलम ६५(अ), ८३ महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.



💥 जप्त मुद्देमाल 💥
१,६०,००० रुपये किमतीच्या एकूण ४० पेट्या (४००० नग) ९० मिली क्षमतेच्या देशी दारूच्या सीलबंद बाटल्या.
४,००,००० रुपये किमतीची दारू वाहतुकीसाठी वापरलेली फोर्ड फिगो (FORD FIGO) कंपनीची कार (क्र. MH 31 BK 9242).
एकूण जप्त माल :- ५,६०,००० रुपये.
आरोपींची नावे :- १) सुनिल रमेश नरुले
२) विपुल तानाबा मेश्राम,फरार/पाहिजे आरोपी ३) हरभजनसिंग सतनामसिंग (सर्व रा. हळदा, तह. ब्रम्हपुरी) ही यशस्वी कारवाई उपविभाग ब्रम्हपुरी पथक आणि स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांच्या संयुक्त पथकाने पार पाडली आहे.