7 November 2026News Website

राजुरा पोलिसांची धडक कारवाई: आंतरराष्ट्रीय चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश!

१७ डिक्ससहित तब्बल १० लाखांचा मुद्देमाल जप्त; मध्य प्रदेशातील दोन चोरटे जेरबंद

राजुरा :-राजुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत ट्रकमधून टायर चोरी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय चोरट्यांच्या टोळीचा राजुरा पोलिसांनी यशस्वी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी मध्य प्रदेशातील दोघा सराईत चोरट्यांना अटक केली असून, त्यांच्याकडून १७ डिक्ससहित सुमारे १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

👉 अशी घडली घटना

फिर्यादी राकेशकुमार देवीलाल रांगडाले (वय ४७ वर्षे, रा. ताटीबंध, रायपूर, छत्तीसगड) यांच्या मालकीच्या एसके ट्रान्सपोर्टिंग कंपनीचे दोन ट्रक (क्र. सीजी २२ ए ७१८२ आणि सीजी २२ एफ २२) रायपूर येथून कोयसा घेऊन भाटीया कोल बांघोरी पांढरपून येथे आले होते. माल खाली केल्यानंतर हे ट्रक लॉयडस मेटल राजुरा रेल्वे साईडिंग येथे माल भरण्यासाठी गेले होते. यादरम्यान चालकांचा फोन बंद झाल्यानंतर जीपीएस लोकेशन तपासले असता, ट्रक रेल्वे साईडिंगवर असल्याचे समजले. मात्र, प्रत्यक्ष पाहणी केली असता दोन्ही ट्रकमधील एकूण १७ टायर डिक्ससहित चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले. याची एकूण किंमत २ लाख ५० हजार रुपये इतकी होती.

पोलिसांची तत्परता आणि धडाकेबाज तपास

फिर्यादीच्या tरारीवरून राजुरा पोलीस स्टेशनमध्ये कलम ३०३(२), ३(५) भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस निरीक्षक नितीन चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली डि.बी. इंचार्ज सपोनि लक्ष्मण लोकरे, पोउपनि सुनील धांडे व डी.बी. पथकाने गोपनीय बातमीदार व सायबर सेलच्या मदतीने तांत्रिक तपासाचक्रे वेगाने फिरवली.

माहितीच्या आधारे पोलिसांनी चकोडीया, जिल्हा शहडोल (मध्य प्रदेश) येथील आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली.

असे आहेत अटक केलेले आरोपी

१. रामलाल गिरधारी यादव (वय २७ वर्षे, रा. चकोडीया, जि. शहडोल, मध्य प्रदेश) २. अजय श्रीकाशी पेटल (वय ३० वर्षे, रा. ब्योहारी, जि. शहडोल, मध्य प्रदेश)

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल

पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली बोलेरो पिकअप गाडी (क्र. एमपी १८ GA ५८६७, किंमत अंदाजे ५०,००० रुपये) आणि १७ ट्रक टायर असा एकूण १०,००,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांचे यशस्वी मार्गदर्शन

सदरची ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी (चंद्रपूर), अपर पोलीस अधीक्षक ईश्वरसातकांडे (चंद्रपूर), आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. कुमार सुशांत (राजुरा) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक नितीन चिंचोलकर यांच्या नेतृत्वाखाली सायबर सेल, सपोनि झाडोकर, पथक आणि पोलीस स्टेशन राजुराच्या गुन्हे शोध पथकातील अधिकाऱ्यांनी व अंमलदारांनी पार पाडली आहे. राजुरा पोलिसांच्या या कामगिरीमुळे चोरट्यांचे धाबे दणाणले आहेत.

अभिषेक किशोर भागडे