Home विदर्भ नागपूर ग्रामीण पोलिसांची मोठी धडक! साडेबारा लाखांच्या गांजा व तीन तस्करांना बेड्या

नागपूर ग्रामीण पोलिसांची मोठी धडक! साडेबारा लाखांच्या गांजा व तीन तस्करांना बेड्या

कान्हान (नागपूर ग्रामीण) :-  अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात नागपूर ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कान्हान पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई करत पोलिसांनी तब्बल ८ किलो ८९८ ग्रॅम गांजा जप्त केला असून, या प्रकरणी तीन तस्करांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत वाहन व रोखडसह एकूण १२,०९,८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.



💥 पोलीस कारवाईचा घटनाक्रम 💥
गोपनीय माहिती :- दिनांक ०८/०९/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि अमली पदार्थ विरोधी पथकाला अवैध गांजा वाहतुकीची गोपनीय माहिती मिळाली होती.
सापळा व वाहन तपासणी :- पोलिसांनी कान्हान येथून मनसर रोडने टोपाज हॉटेलजवळ तार कंपनीसमोरील फाट्या जवळ महिंद्रा वाहन (क्र. यु पी-५७/बी पी-७६९०) अडवून संशयित वाहनाची झडती घेतली.
अमली पदार्थांचा साठा :- वाहनाच्या मागील डिकीमध्ये संशयास्पद रितीने पॅक करून ठेवलेले ९ नग पार्सल मिळून आले. त्यामध्ये हिरव्या रंगाची पाने, काड्या व देठ असलेला ओलासर अमली पदार्थ गांजा आढळला.
👉 तस्करांची नावे 
1. कन्हैया उर्फ शुभम कपिलदेव शाही , वय ३२ वर्षे, रा. गुरुद्वारसमोरील, कांडी, कान्हान, ता. पारशिवनी, जि. नागपूर.
2. हिमांशु नंदलाल शर्मा , वय २५ वर्षे, रा. दिघेड़ा पोस्ट अरखपुर, ता. मधुनन, जि. महु, उत्तर प्रदेश.
3. सुरज राजेंद्र चव्हाण , वय ३२ वर्षे, रा. ताडी पोस्ट धरमपूर, बिसनपुर, ता. मधुनन, जि. महु, उत्तर प्रदेश.



💥 जप्त करण्यात आलेजप्तला मुद्देमाल 💥
८ किलो ८९८ ग्रॅम गांजा,किंमत १,७७,१४0/- रुपये
महिंद्रा वाहन (क्र. यु पी-५७/बी पी-७६९०) किंमत १०,००,०००/- रुपये ०३ अँड्रॉइड मोबाईल व रोख २५००/- रुपये गांजा पॅकिंगचे साहित्य व इतर मुद्देमाल मिळून एकूण १२,०९,८४०/- रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
सदर धडक कारवाई नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मा. श्री. हर्ष ए. पोहार आणि अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. अनिल मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि अमली पदार्थ विरोधी पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली आहे. या प्रकरणी कान्हान पोलीस स्टेशन येथे  कलम ८ (क), २०(ब)(प्प)(ब), २२,२९ एन. डी. पी. एस. कायद्यान्वये** गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.