Home Breaking News नात्याला कलंक! अल्पवयीन पीडितेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला १० वर्ष कठोर कारावासाची शिक्षा;...

नात्याला कलंक! अल्पवयीन पीडितेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला १० वर्ष कठोर कारावासाची शिक्षा; चंद्रपूर न्यायालयाचा दणका.

चंद्रपूर :- मामाच्या नात्याला कािमास लावणारी आणि संतापजनक ठरलेल्या एका प्रकरणात चंद्रपूर न्यायालयाने नराधम आरोपीला १० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. पीडितेवर वारंवार बळजबरीने लैंगिक अत्याचार करणाऱ्या या आरोपीला कायद्याचा दणका बसल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.



दिनांक २८ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ११:३० वाजताच्या सुमारास ही संतापजनक घटना उघडकीस आली होती. पीडितेच्या घरा जवळ राहणारा आणि ज्याला पीडिता ‘मामा’ म्हणत होती, त्याच नराधमाने तिच्या विश्वासाचा गैरफायदा घेत वारंवार बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. आईने विचारणा केल्यावर पीडितेने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर तिला सरकारी रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी तिच्यावर अत्याचार झाल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तात्काळ आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या.



💥 न्यायालयाचा निकाल व शिक्षा 💥
या खटल्याची सुनावणी चंद्रपूरचे जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. श्री. पी. एम. गुप्ता यांच्या न्यायालयात झाली. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ॲड. आिफ शेख यांनी युक्तिवाद केला व भक्कम पुरावे सादर केले. न्यायालयाने सर्व पुरावे ग्राह्य धरून आरोपीला **कलम ३७६(२)(एन) अन्वेये १० वर्ष सक्षम कारावास व ५,००० रुपये दंड (दंड न भरल्यास १ महिना साधी कैद) तसेच कलम ५०६(II) भादवीमध्ये २ वर्ष सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली.



🙏 पोलिसांची यशस्वी कामगिरी 🙏
सदर प्रकरणाचा सखोल तपास महिला पोलीस उपनिरीक्षक सोनाली आगलावे (पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर) यांनी केला. पोनी निशाकांत रामटेके यांचे मार्गदर्शन, महिला हवालदार किशोरी वामनराव गोंडे यांचे कोर्ट पैरवीत सहकार्य लाभले. तसेच पोलीस अधीक्षक मा. आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक मा. ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर पोलिसांच्या दोषसिद्धी कक्षाने ही यशस्वी कामगिरी पार पाडली.