वर्धा :- समाजमाध्यमांवर सातत्याने आक्षेपार्ह विधाने करून कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या वादग्रस्त व्यक्तींवर आता पोलिसांनी कठोर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला आहे. निलेश कराडेविरुद्ध वर्धा पोलिसांनी अत्यंत गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला असून, या कडक कारवाईमुळे विदर्भाच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
💥 गंभीर कलमांचा समावेश :- पोलिसांकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार, निलेश कराडेवर कलम: ३(१)(r), ३(१)(s), २९६, २९९, ३५३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
💥 कयद्याचा बडगा :- न्यायालयाबद्दल, तसेच विविध संवेदनशील विषयांवर बेजबाबदार आणि प्रक्षोभक वक्तव्ये करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर पोलिस प्रशासनाने आता पावले उचलली आहेत.
सामाजिक माध्यमांवरून बडबड :- सोशल मीडियाचा गैरवापर करून स्वस्त प्रसिद्धीसाठी आणि धार्मिक वा सामाजिक सलोखा बिघडवण्याच्या उद्देशाने पसरवल्या जाणाऱ्या व्हिडीओंमुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत होता.
या धडक कारवाईमुळे कायद्याचा वचक निर्माण झाला असून, समाजमाध्यमांवर मनमानी करणाऱ्यांना वर्धा पोलिसांच्या या कठोर भूमिकेमुळे मोठा संदेश मिळाला आहे.




