Home Breaking News वरोऱ्यात ठाकरे गटाची मोठी मुसंडी! शिंदेंच्या शिलेदारांनी सोडली साथ; युवा सेना उपजिल्हाप्रमुखांसह...

वरोऱ्यात ठाकरे गटाची मोठी मुसंडी! शिंदेंच्या शिलेदारांनी सोडली साथ; युवा सेना उपजिल्हाप्रमुखांसह अनेक कार्यकर्त्यांचा’शिवसेनेत’ (उबाठा) जाहीर प्रवेश.

Oplus_131072

वरोरा :-आगामी राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात शिंदे गटाला खिंडार पडले असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने वरोरा आणि भद्रावती तालुक्यात मोठी राजकीय मजल मारली आहे. ठाकरे पक्षाच्या वाढत्या प्रभावावर आणि नेतृत्वावर विश्वास ठेवत आज वरोरा येथे झालेल्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात शिंदे गटाचे युवा सेना उपजिल्हा प्रमुख निखिल मांडवकर , उपतालुका प्रमुख रोशन नारे आणि उपतालुका प्रमुख रूपेश चिंचोलकर यांच्यासह अनेक आक्रमक शिलेदारांनी  कार्यकर्त्यांसह शिवसेनेत (उबाठा) जाहीर प्रवेश केला आहे.



शिवसेना जिल्हा संघटक तथा बांधकाम सभापती (नगर परिषद वरोरा) श्री. मनीष मुरली जेठाणी शिवसेना सचिव तथा युवासेना नेत्या रोहिणी पाटील शिक्षक सेना जिल्हा प्रमुख राजेश नायडू आणि युवासेना जिल्हा विस्तारक संदीप रियाल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली हा दणकेबाज पक्षप्रवेश पार पडला. या मोठ्या राजकीय घडामोडीमुळे वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात शिवसेना (उबाठा) पक्षाची ताकद दुप्पट झाली असून, विरोधकांचे धाबे दणाणले आहेत.
नंदू पढाल माजी तालुका प्रमुख तथा नगर सेवक, भद्रावती, नंदलाल टेमुडे माजी तालुका प्रमुख तथा सरपंच, वरोरा, घनश्याम आसवले माजी भद्रावती शहर प्रमुख,प्रमोद वाघ उपतालुका प्रमुख

या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या विचारसरणीवर निष्ठा ठेवत हातात शिवबंधन बांधले. या पक्षप्रवेशामुळे तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश निर्माण झाला असून, आगामी निवडणुकीच्या दृष्टीने ठाकरे गटाने आपली ताकद अधिक बळकट केली आहे.
“गद्दारीचा मार्ग सोडून शिवसेनेत (उबाठा) परतलेल्या सर्व लढाऊ शिलेदारांचे पक्षात मनापासून स्वागत आहे. निष्ठावंतांच्या या प्रवेशाने चंद्रपूर जिल्ह्यात ठाकरे गट आणखी आक्रमक होईल आणि जनतेच्या प्रत्येक प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून लढा देईल.”
रोहिणी पाटील, शिवसेना सचिव