नागपूर :-आर्णी-केळापूर विधानसभा मतदारसंघातील जनतेला सुरक्षित, सुलभ आणि वेळेची बचत देणारे दळणवळण उपलब्ध करून देण्यासाठी आमदार प्रा. श्री. राजूभाऊ तोडसाम यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. मतदारसंघातील वाढती वाहतूक आणि वारंवार होणाऱ्या अपघातांचे गांभीर्य लक्षात घेत, प्रा. राजूभाऊ तोडसाम यांनी थेट नागपूर येथे जाऊन देशाचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री श्री. नितीनजी गडकरी यांची प्रत्यक्ष भेट घेतली. या महत्त्वपूर्ण भेटीत त्यांनी मतदारसंघातील प्रलंबित आणि अत्यंत गरजेच्या असलेल्या उड्डाणपुलांच्या कामांना त्वरित मंजुरी मिळण्यासाठी सविस्तर चर्चा करत तडाखेबंद पाठपुरावा केला आहे.
💥 या प्रमुख मार्गांवर उड्डाणपुलांची मागणी 💥
पांढरकवाडा शहर परिसर :- पिंपरी ते Y-Point, Y-Point ते घाटंजी रोड तसेच घाटंजी रोड ते टोल नाका (पेट्रोल पंप) या संपूर्ण मार्गावरील वाढती वर्दळ पाहता येथे अत्याधुनिक उड्डाणपुलांची तातडीची गरज असल्याचे केंद्रीय मंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
आर्णी व घाटंजी तालुका :-आर्णी तालुक्यातील जवळा ते लोणी आणि घाटंजी तालुक्यातील खापरी येथील वाघाडी नदी परिसरातील बहुप्रतिक्षित उड्डाणपुलांच्या कामांना गती देण्यासाठी आग्रही मागणी करण्यात आली आहे.
अपघातांना आळा घालण्यासाठी कंबर कसली!
या संपूर्ण मार्गांवर दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक आणि त्यामुळे नागरिकांच्या जीवाला सतत धोका निर्माण होत असल्याचा मुद्दा आमदार प्रा. राजूभाऊ तोडसाम यांनी अत्यंत आक्रमकपणे उपस्थित केला. नागरिकांची सुरक्षितता, वाहतूककोंडीपासून सुटका आणि प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी हे प्रकल्प किती महत्त्वाचे आहेत, हे त्यांनी स्पष्ट केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही या मागण्यांचे गांभीर्य लक्षात घेत सकारात्मक चर्चा केली असून, लवकरच यावर योग्य त्या कार्यवाहीचे आश्वासन दिले आहे.
मतदारसंघाच्या विकासासाठी आणि जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर तडजोड न करता सातत्याने पाठपुरावा करणारे नेते म्हणून आमदार प्रा. राजूभाऊ तोडसाम यांच्या या भूमिकेचे सर्वत्र स्वागत होत असून, यामुळे मतदारसंघातील रखडलेल्या विकासकामांना मोठी चालना मिळणार आहे.
“जनतेची सुरक्षितता हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे! मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाचा प्रवास सुखरूप व्हावा आणि अपघातांचे सावट दूर व्हावे, यासाठी आमचा लढा आणि पाठपुरावा असाच सातत्याने सुरू राहील.”
आमदार प्रा. श्री. राजूभाऊ तोडसाम
🚩 प्रश्न जनतेचे, पाठपुरावा राजूभाऊंचा!
🚩 जनतेची सुरक्षितता… विकासाची प्राथमिकता!




