Home Breaking News सावधान ! ९० व्यक्तींवर पोलिसांची कर्डी नजर; मोकाअंतर्गत कारवाईचे दिले संकेत.

सावधान ! ९० व्यक्तींवर पोलिसांची कर्डी नजर; मोकाअंतर्गत कारवाईचे दिले संकेत.

वरोरा :-९० संशयितांवर विशेष नजर वरोरा शहरासह भद्रावती आणि माजरी परिसरातील वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पोलीस विभागाने कठोर भूमिका घेतली आहे.



कठोर कारवाईचा बडगा गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय असलेल्या व्यक्तींवर प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार असून, सहभाग आढळल्यास ‘मिनी मोका’ किंवा ‘मोका’ कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे.



अवैध धंदे व नशेविरुद्ध आक्रमक पवित्रा अवैध धंदे आणि नशेशी वाढत्या प्रमाणामुळे निर्माण झालेल्या शांततेच्या प्रश्नावर पोलीस प्रशासनाने कॉम्बिंग ऑपरेशन राबवून संशयितांवर करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे.वरोरा शहरासह भद्रावती आणि माजरी परिसरातील वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पोलीस विभागाने आता कठोर भूमिका घेतली आहे. गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय असलेल्या व्यक्तींवर प्रतिबंधक कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असून, अशा व्यक्तींना पोलिसांकडून कारवाईबाबत स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.



अवैध धंदे, नशेशी वाढते प्रमाण आणि विविध गुन्ह्यांमुळे परिसरातील शांतता व सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः तरुण पिढी व्यसनांच्या विळख्यात जात असून महिला व मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी उपाययोजना अधिक तीव्र केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर वरोरा शहरात नुकतेच कॉम्बिंग ऑपरेशन राबवून संशयितांवर नजर ठेवण्यात आली आहे.
यापुढे गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभाग आढळल्यास संबंधितांवर ‘मिनी मोका’ किंवा ‘मोका‘ कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा सज्जड इशारा अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांनी दिला आहे.
वरोरा शहरातील ४७, भद्रावती येथील ३३ आणि माजरी क्षेत्रातील १० अशा एकूण ९० व्यक्तींवर विशेष लक्ष ठेवून कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल, पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते. गुन्हेगारीला थारा दिला जाणार नाही, असा संदेश पोलीस विभागाने या कारवाईतून दिला आहे.