Home Breaking News सावधान! वाहनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना; उद्यापासून HSRP नंबर प्लेट नसलेल्या गाड्यांवर होणार...

सावधान! वाहनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना; उद्यापासून HSRP नंबर प्लेट नसलेल्या गाड्यांवर होणार कारवाई!

महाराष्ट्र :-जर तुमच्या गाडीवर अजूनही ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ (HSRP) नसेल, तर सावधान! कारण उद्या, म्हणजेच १ जुलैपासून वाहनधारकांवर राज्यभरात कडक दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. ३० जून २०२६ ही HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत संपत असल्याने प्रशासनाने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे.




💠 आरटीओच्या ‘या’ सेवा होणार बंद 💠
केवळ दंडच नाही, तर ज्यांच्या वाहनांवर HSRP नंबर प्लेट नसेल, त्यांना आरटीओ (RTO) कार्यालयात मोठा फटका बसणार आहे. १ जुलैपासून अशा वाहनधारकांसाठी खालील महत्त्वाच्या सेवा बंद केल्या जाणार आहेत:
👉 वाहनांचे हस्तांतरण (Vehicle Transfer).

👉 पत्ता बदलणे.

👉 वाहनावरील कर्जबाजारी नोंदणी (Hypothecation).
👉 परवाना नूतनीकरण आणि वाहनातील इतर बदल.




 💠 अधिकृत दर आणि नियम 💠
सर्वसामान्यांची लूट होऊ नये म्हणून शासनाने नंबर प्लेटचे दर निश्चित केले आहेत (GST वेगळा)
👉 दुचाकी :-४५० रुपये.
👉 तीनचाकी :-५०० रुपये.
👉 हलकी मोटर वाहने (कार) व व्यावसायिक वाहने ७४५ रुपये.
केंद्रीय मोटर वाहन नियम १९८९ मधील नियम ५० आणि मोटर वाहन अधिनियमातील कलम १७७ अन्वये ही दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, ज्या वाहनधारकांनी ३० जूनपर्यंत अधिकृत पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करून अपॉइंटमेंट घेतली आहे, त्यांना तात्पुरता दिलासा मिळणार आहे. मात्र, ज्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, त्यांना थेट दंडाचा सामना करावा लागेल.
शासनाने सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांनाही त्यांच्या ताब्यातील वाहनांवर ३० जूनपूर्वी HSRP नंबर प्लेट बसवून घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यामुळे आरटीओचा मनस्ताप टाळण्यासाठी आणि दंड टाळण्यासाठी तातडीने कार्यवाही करा.