चंद्रपूर :-चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने अंमली पदार्थांविरुद्ध मोठी कारवाई करत १०४.२१० ग्रॅम एम.डी. (Mephedrone) ड्रग्जसह दोन आरोपींना गजाआड केले आहे. या कारवाईत पोलिसांनी ६,२१,३७० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, जटपुरा गेट परिसरात एम.डी. ड्रग्जची विक्री होणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी जटपुरा गेट परिसरातील ‘इतनकर पान मंदिर’ जवळ सापळा रचून कारवाई केली.
या कारवाईदरम्यान ओम संतोष इतनकर (वय २५ वर्षे, रा. जटपुरा वॉर्ड, चंद्रपूर) याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे १०४.२१० ग्रॅम एम.डी. ड्रग्ज सापडले. पोलिसांनी त्याला अटक केली असून, त्याच्याकडील चौकशीत त्याने हे ड्रग्ज इरफान उर्फ भुऱ्या पठाण (रा. बागनखिडकी, चंद्रपूर) याच्याकडून विकत घेतल्याची कबुली दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी इरफानलाही ताब्यात घेतले.
💠 अटकेतील आरोपी 💠
१. ओम संतोष इतनकर (वय २५ वर्षे, रा. जटपुरा वॉर्ड, चंद्रपूर)
२. इरफान उर्फ भुऱ्या पठाण (रा. बागनखिडकी, चंद्रपूर)
💠 जप्त केलेला मुद्देमाल 💠
एम.डी. (Mephedrone) १०४.२१० ग्रॅम
मोबाईल फोन :-२ नग
रोख रक्कम :- काही रक्कम
एकूण किंमत :- ६,२१,३७० रुपये
सदर प्रकरणी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये एन.डी.पी.एस. (NDPS) ॲक्ट, १९८५ च्या कलम ८(क), २२(क) व २९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आता पोलीस या ड्रग्जचा पुरवठा नेमका कोठून होतो, याचे जाळे आणि आर्थिक व्यवहारांचा तपास करत आहेत.
💠 कारवाई करणारे पथक 💠
सदर कारवाई पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या पथकात सपोनि हिवसे, पोउनि विनोद भुरले, सुनील गोरकार, संतोष निंभोरकर, ढोके व स्थानिक गुन्हे शाखेतील इतर पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता.




