चंद्रपूर :- उप पोलीस स्टेशन लाठी हद्दीतील मौजा सोनापूर येथे घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या २४ तासांत पर्दाफाश करण्यात चंद्रपूर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी थेट तेलंगणा गाठून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
सोनापूर येथे घडलेल्या घरफोडीचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखा आणि लाठी पोलिसांनी संयुक्त तपास सुरू केला. तांत्रिक तपासातून आरोपी तेलंगणात असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली आणि आरोपी आशिष जानकीराम चौधरी (वय २६, रा. सोनापूर देशपांडे, ता. गोंडपिपरी) याला २४ तासांच्या आत अटक केली.
पोलिसांच्या कारवाईतील ठळक बाबी
मुद्देमाल जप्त :-आरोपीकडून १ लाख ६३ हजार २५० रुपये रोख आणि चोरलेल्या पैशातून घेतलेले १५ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल, असा एकूण १ लाख ७८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुन्ह्यांचा उलगडा :- या कारवाईत उप पोलीस स्टेशन लाठी येथील घरफोडीसह, गोंडपिपरी पोलीस स्टेशन हद्दीतून चोरलेली दुचाकीही जप्त करण्यात आली आहे.
ही धडाकेबाज कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अमोल काचोरे यांच्या नेतृत्वातीलश्री. दीपक काँक्रीटवार (सपोनि) बलराम झाडोकार (सपोनि), स्वामीदास चालेकर (स.फौ.) अजय बागेसर (पोहवा), गोपीनाथ नरोटे (पो.अं.). शेखर माथनकर (पो.अं.) ऋषभ बारसिंगे (चापोअ) अशोक मंजुळकर (पोहवा, पोलीस स्टेशन लाठी) पथकाने केली आहे. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्यामुळे नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक होत आहे.




